ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » माया-ममतांना कसे आवरणार?

माया-ममतांना कसे आवरणार?

२०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी म्हणजेच लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली दिसते आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये, कदाचित मोदी विरुद्ध राहुल, ममता आणि मायावती अशीही होण्याची शक्यता आहे. तसे तर सगळेच विरोधी पक्ष एकत्र येऊन मोदींविरुद्ध निवडणूक लढत आहेत. काहीही करून नरेंद्र मोदींना सत्तेत येऊ द्यायचे नाही, असा चंग बांधलेले विरोधक प्रत्यक्ष निवडणुकीत खरोखरीच एकत्र येतात का, हे लवकरच दिसून येईल. महिनाभरापूर्वी काँग्रेसने घोषणा केली होती की, मोदींच्या विरोधात राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. पण, नंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांचीही नावे पुढे आली. इकडे महाराष्ट्रातून शरद पवार हेही सुप्त इच्छा ठेवून आहेत. पंतप्रधान होण्याची अनेकांना इच्छा आहे. त्यामुळे विरोधी ऐक्य टिकेल का, हा प्रश्‍नच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती त्यांच्याच नावाला असताना, विरोधी पक्षांचे लोक दिवसा स्वप्न का पाहात आहेत, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! सगळ्या विरोधी पक्षांचे नेते जेव्हा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एकत्र जमले होते, तेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा निवडणुका जिंकल्यानंतर ठरवायचा, असे ठरले होते. पण, प्रत्यक्षात निवडणुकीच्या फार आधीच काँग्रेसने राहुल गांधी यांचे नाव पुढे केल्याने आधी झालेली सहमती संपुष्टात आल्याचे चित्र आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांच्या नावाला विरोधी पक्षांकडून फारसे समर्थन मिळताना दिसले नाही म्हणून काँग्रेसनेही दोन पावलं मागे जाणं पसंत केलं. आम्हाला पंतप्रधानपदासाठी कोणताही चेहरा चालेल, तो फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक नसावा, अशी अट काँग्रेसने घातली आहे. याचा अर्थ, राहुल गांधींना समर्थन मिळेल याची खात्री काँग्रेसला राहिलेली नाही. राहुल गांधी यांना भारताच्या राजकारणातला फारसा अनुभवच नाही मुळात. ते त्यांनी त्यांच्या वर्तनातून सिद्धही केले आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कैक पटींनी अनुभवी असलेले आणि जुनेजाणते विरोधी नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काम करतील याची कुठलीही शक्यता दिसत नाही. शिवाय, परस्परविरोधी विचार असलेले विरोधकही केवळ मोदीविरोध या एकाच मुद्यावर एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याला कुठलाही नैतिक आधार नाही. असा आधार नसलेले ऐक्य फार काळ टिकत नसते, हा अनुभव आहे. त्यामुळे ऐक्य झालेही तरी ते अभद्र सिद्ध होईल आणि तुटेल व जनतेने यांना निवडून दिले तर जनतेचाच भ्रमनिरास होईल, यात शंका नाही! लोकसभेत तेलुगू देशम पक्षाने मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणला होता. त्यावर बोलताना राहुल गांधी दोन पावलं पुढे सरकलेले दिसले. पण, भाषणानंतर त्यांनी जे काही केले, त्यामुळे ते तीन पावलं मागे गेलेले दिसले. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या गळ्यात जबरदस्तीने पडणे ही कृती भाजपाने बालीश ठरविली. भाजपाने राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली. विरोधी पक्ष म्हणून भाजपाची टीका स्वाभाविकही म्हणता येईल. पण, राहुलबाबाच्या कृतीवर दस्तुरखुद्द काँग्रेस पक्षातूनही नापसंती व्यक्त करण्यात आली. राहुल गांधी यांचा त्या दिवशीचा व्यवहार राजशिष्टाचाराला धरून नसल्याने काँग्रेस पक्षातूनच त्यांच्याविरुद्ध आवाज उठला होता. ही काँग्रेससाठी आणि विरोधी ऐक्यासाठीही चिंतेची बाब म्हटली पाहिजे. गेल्या काही दिवसांतला घटनाक्रमही लक्षात घेतला पाहिजे. लोकसभेत तुलुगू देशमने आणलेला अविश्‍वास प्रस्ताव १२५ विरुद्ध ३२५ असा बहुमताने फेटाळला गेला. गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी अविश्‍वास प्रस्ताव फेटाळला गेला, शनिवारी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे जाहीर केले की, येत्या जानेवारी महिन्यात आपण कोलकाता येथे पन्नास लाख लोकांच्या उपस्थितीत राजकीय मेळावा भरवू आणि त्यासाठी सोनिया गांधींसह सगळ्या प्रमुख विरोधी नेत्यांना बोलावू. ममता बॅनर्जी यांचा इरादा काँग्रेसच्या लक्षात आला. ममतांना पंतप्रधान व्हायचे आहे, ही बाब लक्षात येताच काँग्रेस पक्ष सावध झाला. लागलीच नवगठित काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली आणि त्यात असे ठरवण्यात आले की, पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी हेच राहतील. मोदींना हरवायचे असेल तर सगळ्यांनी आपापली महत्त्वाकांक्षा नियंत्रणात ठेवून राहुल गांधी यांचे हात मजबूत करायला हवे, असा सल्लाही इतर विरोधी नेत्यांना काँग्रेसकडून देण्यात आला. विरोधी पक्षांनी कितीही ऐक्य दाखविले, काहीही झाले तरी लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा मुकाबला पाहायला मिळणारच! असा मुकाबला झालाच तर त्यात नरेंद्र मोदी बाजी मारतील, यात शंका नाही! काँग्रेसला हेही माहिती आहे की ममता बॅनर्जी राहुल गांधींना मानत नाहीत, त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा तर प्रश्‍नच नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना इशारा देण्याचाही प्रयत्न काँग्रेसने कार्यसमितीच्या बैठकीतून केला आहे. आपल्याच नेतृत्वात सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र मोट बांधावी, असा काँग्रेसचा प्रयत्न पंतप्रधानपद स्वत:कडे ठेवण्यासाठीच आहे. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनीही पंतप्रधानपदासाठी आपली दावेदारी सादर केली आहे. तसे पाहिले तर त्यांची अस्तित्वासाठीची लढाई आहे. पण, पंतप्रधानपद भूषविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा कुणापासूनही लपून राहिलेली नाही. २०१२ साली मायावती सत्तेतून बाहेर झाल्या, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ १९ जागाच मिळाल्या. त्यामुळे मायावतींच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता धोक्यात आली होती. त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. पक्षातून बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढली होती. पण, धडपड करीत त्यांनी पक्ष जास्त फुटू दिला नाही. उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला आणि भविष्यात युती करण्याचे संकेत देत पक्षाला लागलेली ओहोटी थांबवली. आता त्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. या लढाईत त्यांनी पंतप्रधानपदासाठी स्वत:ला सज्ज केल्याने काँग्रेसपुढची डोकेदुखी वाढली आहे. कर्नाटकात काँग्रेसने जेडीएसशी युती केली आहे. पण, अल्पावधीतच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी कंटाळले आहेत. काँग्रेससोबत आघाडी चालवणे म्हणजे विष पचवण्यासारखे असल्याची त्यांची प्रतिक़्रिया बोलकी आहे. त्यामुळे कर्नाटकात लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागणार, हे स्पष्ट झाले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये बसपाशी युती करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. पण, राजस्थानात बसपाला सोबत घ्यायला काँग्रेसची तयारी नाही. ही बाब बसपाला खटकणारी आहे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये बसपा काँगे्रसला साथ देणार नाही. एकूणच सगळी परिस्थिती लक्षात घेता, पुढली लोकसभा निवडणूक काँग्रेसला आणि विरोधी पक्षांना कठीणच जाणार, हे निश्‍चित!

https://tarunbharat.org/?p=58492
Posted by : | on : 27 Jul 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

माया-ममतांना कसे आवरणार?

  1. Sanatkumar Patil Reply

    28 Jul 2018 at 3:22 pm

    Apan modi baddal ya madhye jast lihile nahi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (269 of 777 articles)


वैद्य | डॉ.माधव गोडबोले हे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. नोकरशहा म्हणून त्यांच्या ३३ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ...

×