ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक » राजस्थान : गटबाजीचा काँग्रेसला फटका बसणार

राजस्थान : गटबाजीचा काँग्रेसला फटका बसणार

श्यामकांत जहागीरदार |

राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून २०० जागांसाठी शुक्रवार ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये भाजपा आपली सत्ता कायम राखणार की राज्यातील परंपरेनुसार काँग्रेस सत्ता हस्तगत करणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
भाजपाला यावेळी बहुमत मिळाले तर वसुंधरा राजे यांना एकूण तिसर्‍यांदा आणि सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे. सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी राजस्थानमध्ये याआधी भाजपाचे भैरोसिंह शेखावत यांना मिळाली होती. शेखावत यांनी एकूण तीनदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. यापैकी एकदा जनता पक्षाचे नेते म्हणून तर दोनदा भाजपाचे नेते म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. रालोआच्या काळात देशाचे उपराष्ट्रपती होण्याचा बहुमानही भैरोसिंह शेखावत यांना मिळाला होता.
काँग्रेसचे मोहनलाल सुखाडिया यांनी सलग चारवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. सर्वाधिक काळ राजस्थानचे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही सुखाडिया यांच्या नावावर आहे. सुखाडिया आपल्या चार कार्यकाळात ६०३८ दिवस राजस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांचा हा विक्रम अजूनतरी अबाधित आहे. काँग्रेसचे सी. एस. वेंकटचारी सर्वात कमी काळ म्हणजे फक्त ११० दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते.
मोहनलाल सुखाडिया यांच्या खालोखाल भैरोसिंह शेखावत यांनी तीन कार्यकाळ मिळून ३८०८ दिवस राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले. मात्र मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांना एकदाच पूर्ण करता आला. जनता पक्षाच्या कार्यकाळात भैरोसिंह शेखावत पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. २२ जून १९७७ ते १६ फेब्रुवारी १९८० या काळात शेखावत मुख्यमंत्री होते. शेखावत यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ ९७० दिवसांचा होता. ४ मार्च १९९० ला शेखावत दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. १५ डिसेंबर १९९२ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. शेखावत यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ १०१७ दिवसांचा होता. ४ डिसेंबर १९९३ ला शेखावत तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. २९ नोव्हेंबर १९९८ पर्यंत म्हणजे १८२१ दिवस ते मुख्यमंत्री होते.
भैरोसिंह शेखावत यांचे सरकार दोनदा बरखास्त करण्यात येऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे पतन होत केंद्रात इंदिरा गांधी यांची सत्ता आली. इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. यात राजस्थानमधील भैरोसिंह शेखावत यांचे सरकार १६ फेब्रुवारी १९८० ला बरखास्त करण्यात आले. १६ फेब्रुवारी ते ६ जून १९८० या काळात राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट होती.
१९९२ मध्ये अयोध्येत बाबरी ढाचा पाडण्यात आल्यानंतर भैरोसिंह शेखावत यांचे सरकार दुसर्‍यांदा बरखास्त करण्यात आले. १५ डिसेंबर १९९२ ते ४ डिसेंबर १९९३ या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट होती. मात्र यानंतर झालेल्या निवडणुकीत भैरोसिंह शेखावत यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आणि शेखावत तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. २९ नोव्हेंबर १९९८ पयर्र्ंत शेखावत राज्याचे मुख्यमंत्री होते.
१९९८ पासून मात्र राजस्थानच्या जनतेने सलग दुसर्‍यांदा कोणत्याच राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. १९९८ ते २०१३ या चार निवडणुकीत राज्यात आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपा यांना जनतेचा कौल मिळाला आहे. १९९८ आणि २००८ मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता होती, तर २००३ आणि २०१३ मध्ये भाजपाची. हीच परंपरा जनतेने यावेळीही कायम ठेवली तर यावेळी काँग्रेसला सत्ता मिळायला पाहिजे. मात्र राजकारणात कधी काय होईल, मतदार कसा विचार करतील, हे कोणीच सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू राहात नाही, तसेच जनतेच्या कौलाचेही होऊ शकते.
यावेळी तिसर्‍यांदा वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर त्या भैरोसिंह शेखावत यांचे दोन विक्रम मोडू शकतात. शेखावत यांचा पहिला विक्रम सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याचा तर दुसरा विक्रम मोहनलाल सुखाडिया यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात वसुंधरा राजे १८३१ दिवस मुख्यमंत्री होत्या. राजे यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ तेवढाच आहे. त्यामुळे शेखावत यांचा ३८०८ दिवस मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्या सहज मोडू शकतात. विशेष म्हणजे राजे यांनी दोनदा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, ज्याची शक्यता अतिशय कमी आहे, ते सुद्धा शेखावत यांचा विक्रम मोडू शकतात. मात्र सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मोहनलाल सुखाडिया यांचा विक्रम गहलोत यांना कधीच मोडता येणार नाही. कारण त्यासाठी चारवेळा गहलोत यांना मुख्यमंत्री व्हावे लागणार आहे. गहलोत तिसर्‍यांदाच मुख्यमंत्री व्हायची शक्यता नसल्यामुळे ते चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही.
राजस्थानमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे, विशेष म्हणजे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. बसपा, आप, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, भारतवाहिनी पार्टी आणि अन्य राजकीय पक्षांनीही राजस्थानमध्ये पूर्ण ताकद पणाला लावल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दिल्लीव्यतिरिक्त कुठेच ताकद नसलेली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी राजस्थानमध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. केजरीवाल यांच्या आपने याआधी पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हात दाखवून अवलक्षण करून घेतले होते. राजस्थानमध्ये सुद्धा आपच्या बाबतीत यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नाही.
राजस्थानमध्ये भाजपाला सुरुवातीला असलेले प्रतिकूल वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी झंझावाती प्रचार सभांनी बदलले आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही प्रचारातून जनतेची नाराजी दूर केली. उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर भाजपात काही प्रमाणात बंडखोरी झाली होती. उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे अनेक मंत्र्यांनी तसेच आमदारांनी भाजपाविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले होते. पण यातील अनेकांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावण्यात भाजपाचे राज्यातील नेते यशस्वी झाले. भाजपाचे नेते आपसातील मतभेद विसरून एकदिलाने प्रचारात सहभागी झाल्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे.
दुसरीकडे काँग्रेसला बंडखोरीची लागण उमेदवार निश्‍चित केल्याच्या दिवसापासूनच झाली होती. त्यामुळे काँग्रेसला आपले उमेदवारही निश्‍चित करता येत नव्हते. काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर तर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. आपल्या बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यात काँग्रेसचे नेते यशस्वी झाले नाहीत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी असलेले अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोन दावेदार आणि त्यांच्यातील शहकाटशह यामुळे काँग्रेसची बाजू कमजोर झाली. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट अशा दोन गटात राज्यातील काँग्रेस विभाजित झाली. त्यांचा फटका काँग्रेसला निश्‍चितच बसणार आहे.
सत्ता मिळण्याची दूरदूरपर्यंत कोणतीच शक्यता नसताना मुख्यमंत्रिपदासाठी गहलोत आणि पायलट यांच्यातील मतभेद आणि संघर्ष म्हणजे ‘बाजारात तुरी आणि …’ यासारखा आहे. काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करत असते, काँग्रेसला पराभूत करण्यासाठी दुसर्‍या कोणाची गरज नाही, असे म्हटले जाते, याचे प्रत्यंतर राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीतून येणार आहे.

https://tarunbharat.org/?p=69063
Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्यामकांत जहागीरदार, संपादकीय, स्तंभलेखक (338 of 1509 articles)


पालकमंत्री कसा असावा, याचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी! त्यांच्याकडे नागपूरसोबतच भंडारा ...

×