ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » रामभक्तांचे काय चुकले?

रामभक्तांचे काय चुकले?

अयोध्येत राममंदिर बांधले पाहिजे, कारण अयोध्या ही प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी आहे. रामभक्त हिंदूंची मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण होत नाही, त्यात सातत्याने अडथळे आणले जातात, मंदिराला विरोध केला जातो, ही बहुसंख्य हिंदू असलेल्या भारताची शोकांतिका म्हटली पाहिजे. राममंदिराचा वाद गेली कित्येक वर्षे न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर कुणी भाष्य करत नाही. पण, याचा अर्थ असा नाही की, न्यायालय निर्णयच करणार नसेल तर रामभक्तांनी डोळे मिटून बसावे? न्यायालयाने निकाल द्यायला एवढी वर्षे घेण्याचे काही कारण नाही. जिथे रामाचे भव्य मंदिर व्हावे अशी या देशातील बहुसंख्य हिंदूंची इच्छा आहे, त्या ठिकाणी आधी मंदिरच होते आणि ते बाबर नावाच्या आक्रमकाने पाडले होते व तिथे मशीद उभी केली होती, याचे सगळे पुरावे न्यायालयाला सादर केल्यानंतरही न्यायालय निर्णय करणार नसेल, तर रामभक्तांनी गप्पच राहावे, त्यासाठी काही प्रयत्न करू नये, सरकारांवर दबाव आणू नये असा थोडीच होतो? गेल्या रविवारी नागपुरात हुंकार रॅली झाली. या रॅलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्पष्ट वक्तव्य केले. राममंदिराच्या मुद्याला न्यायालयाची प्राथमिकता नसेल तर कायदा करा, असे रोखठोक विधान मोहनजींनी केले, त्याला मोठा अर्थ आहे. मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिला तर देशात दंगली घडू शकतात, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण करून वर्षानुवर्षे हिंदूंना न्याय नाकारला जात आहे, ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकेल? कुणीच नाही. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा हिंदूंचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. रामभक्तांनी सर्वोच्च न्यायालयावर भरपूर विश्‍वास ठेवला, आज निकाल येईल, उद्या निकाल येईल, या आशेवर संयमही भरपूर दाखविला. पण, आता हिंदूंच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. राममंदिर शीघ्रातिशीघ्र झाले पाहिजे, तेही संकल्पित स्वरूपात झाले पाहिजे, ही रामभक्तांची इच्छा चुकीची नाही. आता रामभक्त सरकारवर दबाव आणत आहेत. अयोध्येतही धर्मसंसद झाली. त्यातही राममंदिर तातडीने बांधण्याबाबत संकल्प करण्यात आला. ज्याप्रमाणे रामसेवकांनी १९९२ साली बाबरी ढांचा उद्ध्वस्त करून अपमानाचा डाग धुवून काढला होता, तशी स्थिती राममंदिर बांधण्याच्या बाबतीत होऊ नये, याकरिता आता न्यायालयाने शीघ्र गतीने प्रकरण निकालात काढायला हवे. अन्यथा, रामभक्त अयोध्येत पोहोचून रात्रीतून कधी राममंदिर बांधतील अन् जगाला आश्‍चर्यचकित करतील, हे सांगता यायचे नाही! राममंदिराच्या मुद्यावरील सुनावणी न्यायालयाने टाळली आणि २०१९ साली होईल, असे जाहीर केले. पण, सुनावणी नेमकी कधी होईल, त्याची तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे रामभक्त नाराज, निराश आहेत. त्यांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करायला हवी, असे न्यायालयाचे मत आहे? एरवी कुठेही साधे खुट्ट जरी वाजले, तरी बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटणारे पुरोगामी कुठे वाळूत चोच खुपसून बसले आहेत, काही कळायला मार्ग नाही. न्यायालयाकडून वेळकाढूपणा सुरू झाल्याने लोकांनी आता सरकारवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या दबाव आणायला सुरुवात केली आहे. याचाही अर्थ चुकीचा काढला जात आहे. भाजपाला निवडणुका जिंकायच्या असल्या की रामाला पुढे केले जाते असे सांगत, राममंदिर निर्माणाच्या हिंदूंच्या भावनेशी खेळ करण्याचा घाणेरडा प्रकार या देशातील पुरोगामी करीत आहेत. रामाचे मंदिर व्हावे, ही देशातील तमाम रामभक्तांची इच्छा आहे. त्याचा भाजपाशी काय संबंध हो? भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एकेकाळी रथयात्रा जरूर काढली होती. कारण, तेही रामभक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी राममंदिराचा मुद्दा भाजपाच्या राजकारणाशी जोडून रामभक्तांच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याचा खेळ पुरोगाम्यांनी करू नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही अयोध्येत जाऊन आले, साधू-संतांनीही अयोध्येत धर्मसंसद भरवली. याचे प्रमुख कारण म्हणजे न्यायालयाकडून टाळली गेलेली सुनावणी हेच आहे. बरं, न्यायालयाने सुनावणीची नवी तारीखही जाहीर केली नाही. नव्या वर्षात नवे पीठ सुनावणी करणार, एवढेच सांगण्यात आले. असेच जर सुरू राहिले, तर हिंदूंच्या अनेक पिढ्या निघून जातील आणि रामाचे मंदिर होणारच नाही. न्यायालयाकडून गांभीर्याने सुनावणीच होत नसल्याने रामभक्तांनी करायचे तरी काय? आता जनआक्रोश वाढणार आहे. रामाचे मंदिर बांधण्यास फार विलंब झाला आहे. त्यामुळेच आता कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता सरकारने अध्यादेश काढून राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरते आहे. या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देते, यावर हिंदू समुदायाच्या आंदोलनाची दिशाही ठरणार आहे. रामभक्तांनी न्यायालयाचा भरपूर आदर केला. न्यायायल जो काही निर्णय देईल तो मान्य करण्याची तयारी हिंदूंनी दाखविली आहे. तरीही न्यायालय निर्णयच देणार नसेल तर हिंदूंनी करायचे काय? सगळे पुरावे मंदिरासाठी अनुकूल असल्याने न्यायालय निर्णय देण्यास मागेपुढे पाहात आहे काय, असा संशय रामभक्तांकडून व्यक्त केला जाणे, न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नाही. सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता, त्याला सर्वोच्च न्यायालयाने मे २०११ मध्ये स्थगिती दिली होती. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण, २०१६ साली सुब्रम्हण्यम् स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आणि गतीने सुनावणी करावी असा आग्रह धरला, तेव्हाकुठे त्यावर काही हालचाल सुरू झाली. त्या वेळी जे सरन्यायाधीश होते, जे. एस. खेहर यांनी असे मत व्यक्त केले होते की, राममंदिराच्या मुद्यावर परस्परसहमती झाली तर अधिक चांगले. परस्परसहमती तयार करण्याचे बरेच प्रयत्न झालेत. मुस्लिम समुदायातील काही समजदार बांधवांनी सहमतीची तयारीही दाखविली. पण, ज्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, ते लोक सातत्याने मंदिराला विरोध करीत आहेत. सुप्रीम कोर्टही जलद गतीने सुनावणी करायला तयार नाही. त्यामुळे रामभक्तांचा संयम आता सुटत चालला आहे आणि तसा तो सुटत जाणे स्वाभाविकही म्हटले पाहिजे. २०१९ च्या निवडणुका होईपर्यंत सुनावणी टाळली जावी, असा एक युक्तिवादही न्यायालयात करण्यात आला होता. हा युक्तिवाद तसा फालतूच होता. राममंदिराचा संबंध निवडणुकीशी जोडण्याचे कारण काय? कारण, राममंदिर झाले तर पुढली अनेक वर्षे भाजपाचीच सत्ता येईल, ही विरोधी पक्षांच्या मनातील भीती. ही भीती निरर्थक आहे. राममंदिराचा आणि भाजपाच्या जिंकण्याचा तसा काही संबंध नाही. जनता कामाच्या आधारावर सरकारे निवडून आणत असते आणि बदलतही असते…

https://tarunbharat.org/?p=68586
Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (29 of 773 articles)


जहागीरदार | तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समिती, भाजपा आणि काँग्रेस, तेलगू देसम्, भाकपा आघाडीत ...

×