ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » ‘वंदे मातरम’ला विरोध कशासाठी?

‘वंदे मातरम’ला विरोध कशासाठी?

बबन वाळके |

तीन राज्यांत सत्ता हाती आली म्हणून सत्तेचा माज किती चढावा? मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना जरा अधिकच माज चढलेला दिसत आहे. त्यांनी प्रचाराच्या वेळेसच जाहीर केले होते की, राज्यात संघाच्या शाखा लागू देणार नाही. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, त्यांना ते शक्य झाले नाही. आता कमलनाथ हे उगवले. सत्तेची धुंदी इतकी डोक्यात चढत असते की, सत्ता गेल्यावरच ती उतरते. कमलनाथ यांचे तसेच काही झाले आहे. पण, त्याही पुढे आणखी एक पाऊल टाकत कमलनाथ यांनी आपली कुबुद्धी दर्शवून देशाचाच अपमान करणारा निर्णय घेतला. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना, गेल्या १४ वर्षांपासून सर्व शासकीय कर्मचार्‍यांनी पहिल्या तारखेला वंदे मातरम् गीत म्हणण्याची परिपाठी होती. यावरही कमलनाथ यांनी बंदी घातली. राहुल गांधी यांच्याच इशार्‍यावर त्यांनी हे केले असणार. काँग्रेसचे चरित्र आणि चारित्र्य जगाला माहीत आहे. त्याला जागूनच कमलनाथ यांनी वंदे मातरम् गीतावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असावा. त्याला लगेच प्रत्युत्तर म्हणून शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले की, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्व आमदार विधिमंडळासमोर उपस्थित राहून वंदे मातरम्चा जयघोष करतील. या मुद्यावर देशभरातून कमलनाथ यांच्या तोंडात शेण घातले गेल्यानंतर त्यांना आता कुठे जाग आली आहे. वेगळ्या पद्धतीने आता ते वंदे मातरम् म्हणणार आहेत. त्यासाठी पोलिस बॅण्डही लावणार आहेत म्हणे. पण, कमलनाथजी, जो बूंदसे गई वो हौदसे नही आती… कमलनाथ यांनी फार मोठे पाप केले आहे. या पापाचे प्रायश्‍चित्तच नाही, एवढे हे गंभीर पाप आहे. त्यांनी देशाचा अपमान केला, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लक्षावधी जनांनी बलिदान दिले, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे असंख्य स्वातंत्र्यसेनानी हसत हसत, वंदे मातरम्चा जयघोष करीत फासावर चढले त्या सर्वांचा कमलनाथ यांनी अपमान केला. कमलनाथ हे काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणवतात, पण त्यांना काँग्रेसचाच इतिहास माहीत नाही, हे केवढे दुर्देैव!
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराने संपूर्ण देशाचेच नव्हे, तर ब्रिटिशांचेही लक्ष वेधून घेतले. तो लढा अयशस्वी झाला नसेल, पण तेव्हापासून प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्जलित करण्याचे काम या १८५७ च्या संग्रामाने केले, हे नाकारून चालणार नाही. पुढे भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकरबंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लजपतराय यांसारख्या दिग्गजांनी ब्रिटिशांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. याच कालावधीत इंग्रजांनी ‘गॉड सेव्ह द क्वीन’ हे गीत बनविले आणि ते राष्ट्रगीत म्हणून भारतीयांवर लादले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांना याचा प्रचंड संताप आला. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची तळमळ जागी होतीच. देशाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत अधिक धगधगावी म्हणून १८७६ च्या नोव्हेंंबर महिन्यात त्यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले व हे आपल्या देशाचे खरे राष्ट्रगीत झाले पाहिजे, असा संदेश दिला. नंतर १८८२ साली त्यांनी ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहिली व त्यातही या गीताचा समावेश केला. १८९६ सालच्या काँग्रेस अधिवेशनात स्वत: रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गाऊन संपूर्ण वातावरण भारावून टाकले. १९०५ साली या गीतावर इंग्रजांनी बंदी घातली. त्याच साली बंगालच्या विभाजनाच्या वेळी वंग-भंग चळवळीत हे गीत आंदोलनाची प्रेरणा बनले. बंदी असूनही बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात हे गीत दुमदुमले. वंदे मातरम् हे गीत प्रत्येक भारतीयाच्या तोंडी बसले. लाला लजपतराय यांनी काढलेल्या पाक्षिकाला वंदे मातरम् हेच नाव दिले. १९०७ साली मादाम कामा यांनी मध्यभागी वंदे मातरम लिहिलेला राष्ट्रध्वज बर्लिनमध्ये फडकावला. पुढे १९१५ पासून वंदे मातरम् या गीतानेच काँग्रेस अधिवेशनाची सुरुवात होऊ लागली. ही परिपाठी १९२१ पर्यंत कायम होती. १९२१ च्या काँग्रेस अधिवेशनात खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याचा ठराव पारित झाला आणि मुस्लिमांचा प्रभाव वाढला.
वंदे मातरम् हे इस्लामविरोधी आहे, अशी बांग देत मोहम्मद अली जिना आणि त्याच्या मुल्लांनी या गीताला विरोध केला. हे गीत इस्लामविरोधी आहे, असे जाहीर केले. काँग्रेसने कट्टर मुस्लिमपंथीयांच्या दबावाला बळी पडून नंतर हे गीत गाणे बंद करून टाकले. काँग्रेसचे त्यावेळचेही चरित्र पाहा. १९३७ च्या काँग्रेस अधिवेशनात असा निर्णय घेतला गेला की, वंदे मातरम् गीतातील दोन कडव्यांत मूर्ती नाही. म्हणून पहिले दोन कडवेच राष्ट्रगीत म्हणून गायले जाईल. बाकी चार कडव्यांत मूर्तीचा संबंध येत असल्यामुळे ते चार कडवे गायिले जाणार नाहीत. म्हणजे पुन्हा कट्टरपंथीय मुस्लिमांचे लांगूलचालन!
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेचे कामकाज संपण्याच्या वेळी २४ जानेवारी १९५० रोजी अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी घोषित केले की, जन गण मन हे गीत राष्ट्रगीत असेल. तसेच वंदे मातरम् या गीताचेही देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अतुलनीय योगदान असल्यामुळे या गीतालाही राष्ट्रगान म्हणूनच मान्यता असेल आणि दोन्ही गीतांना समान दर्जा असेल, असे जाहीर केले. त्याचा प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो. संविधान सभेचे काम संपल्यानंतर सर्व सदस्य उभे राहिले आणि म्हणाले, वंदे मातरम्. यावेळी अनंतशायनम अय्यंगार म्हणाले, आधी आपण जन गण मन गाऊ या. सदस्य पूर्णिमा बॅनर्जी यांनी जन गण मन हे गीत गायिले. त्यानंतर अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी पुकारा केला- वंदे मातरम्. सर्व सदस्य उभे झाले. पंडित लक्ष्मीकांता मैत्र यांनी वंदे मातरम् गायिले. यानंतर संविधान सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे डॉ. राजेंद्रबाबू यांनी घोषित केले. ज्या गीताला डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी मान्यता दिली, स्वत: वंदे मातरम् गायिले, त्यांचा आणि संविधानाचाही कमलनाथ यांनी अपमान केला.
याचा अर्थ केवळ मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी राहुल गांधींच्या सांगण्यावरून वंदे मातरम् गीतावर बंदी घालण्याचा कमलनाथ यांनी हा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांनी ज्यांनी वंदे मातरम्चा नारा बुलंद करीत आपले बलिदान दिले, फासावर चढले, तुरुंगवास भोगला, अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, ब्रिटिशांच्या अत्याचारांमुळे ज्यांनी देह ठेवला, त्या सर्वांचा, संविधानाचा, कमलनाथ आणि काँग्रेस पक्षाने अपमान केला. त्यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे.
दहा लाखांचा दंड भोगणारा दोषी
कमलनाथ यांचा महिमा काय वर्णावा? या महाशयांनी कुलू-मनालीजवळ बियास नदीचा प्रवाह वळवून तेथे स्पॅन नावाचे एक अलिशान मोटेल बांधले. अगदी नदीच्या पात्रापर्यंत त्यांना जागा देण्यात आली होती. हा सर्व भाग संरक्षित जंगलाचा भाग होता. अर्थात, हे सर्व काम बेकायदेशीरच होते. त्याला एक पर्यावरणवादी वकील एम. सी. मेहता यांनी आव्हान दिले. सुप्रीम कोर्टाने या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘नीरी’च्या संचालकांना नियुक्त केले. नीरीचा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एम. बी. शाह व न्यायमूर्ती दोराईस्वामी राजू यांनी कमलनाथ यांना दोषी धरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढत त्यांना दहा लाखांचा दंड ठोठावला. कमलनाथ यांनी मोटेल बांधून पर्यावरणाचे प्रचंड नुकसान केले आहे, असा शेराही कोर्टाने मारला. लक्षणीय बाब म्हणजे कमलनाथ हे केंद्रात पर्यावरण मंत्री होते. त्यांच्या धंद्याचे साम्राज्य देशात सर्वदूर पसरले असल्याचे जे बोलले जात होते, त्यातील हे एक मोटेल.
१९८४ च्या शीख दंगलीतील आरोपी
कमलनाथ हे १९८४ च्या शीख नरसंहारातील एक आरोपी आहेत. सज्जनकुमार या काँग्रेस नेत्याला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे, आता कमलनाथ आणि जगदीश टायटलर यांच्याही केसेस खुल्या करण्याचा निर्णय ३४ वर्षांपासून न्यायालयीन लढा देणारे अ‍ॅड. एच. एस. फुल्का यांनी घेतला आहे. आता कमलनाथसारखे अनेक लोक कायद्यापासून पळवाट काढू शकणार नाहीत. कमलनाथ यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. पण, त्यांना त्या वेळी कोर्टाने सोडून दिले होते. आता मात्र ते सुटणार नाहीत, असे फुल्का यांचे म्हणणे आहे.

https://tarunbharat.org/?p=72025
Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : उपलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय (141 of 847 articles)


करारावर लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी राहुल गांधी यांचे पुरते वस्त्रहरण केल्यानंतर, शुक्रवारी पुन्हा संरक्षणमंत्री निर्मला ...

×