ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » विजयाचे तोरण बांधणारा मुख्यमंत्री!

विजयाचे तोरण बांधणारा मुख्यमंत्री!

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक विधानसभा व विधान परिषदेत एकमताने गुरुवारी मंजूर झाले. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यावर हा कायदा अधिकृतपणे लागू होईल. याचे श्रेय नि:संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पाहिजे! मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी मराठा समाजाने राज्यभर जे लाखो लोकांचे मूक मोर्चे काढले, त्यामुळे याची पृष्ठभूमी तयार झाली, हेही खरेच; परंतु कायद्यासमोर टिकणारे आरक्षण देण्याचे प्रामाणिक व सफल प्रयत्न केल्याचे तसेच विजयाचे तोरण बांधण्याचे श्रेय मात्र फडणवीसांचेच आहे! मराठा समाजाने इतकी वर्षे जे आंदोलन केले, काहींना त्यात जीवही गमवावा लागला, त्यामुळेच हे आरक्षण मिळाले. फडणवीस सरकारचा नाइलाज होता म्हणून त्यांनी हे दिले. अशी भावनाही व्यक्त होत आहे. हाच तर्क लावायचा म्हटला, तर संयुक्त महाराष्ट्राचे श्रेय यशवंतराव चव्हाणांनाही द्यायला नको. ते एकटेच लढत होते का? आणि तरीही, संयुक्त महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश यशवंतरावांनीच आणला, असे सांगितले गेले. मग हेही चूकच म्हणावे लागेल. मराठ्यांचा अनभिषिक्त नेता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व मराठ्यांचेच कथित वर्चस्व असलेली काँग्रेस यांची पंधरा वर्षे सत्ता असताना, आरक्षण का मिळाले नाही? शेवटी शेवटी आरक्षण दिले, पण ते कायद्यासमोर टिकणार नाही, असेच दिले. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनामुळे हे आजचे आरक्षण मिळाले, हे अर्धसत्य आहे. आंदोलनामुळे, लाखोंच्या मूक मोर्चामुळे हा विषय ऐरणीवर आला, हे खरेच. पण त्याची दखल घेत, प्रामाणिकपणे प्रयत्न करीत, आरक्षणाचा कायदा करण्याचे श्रेय मात्र फडणवीस सरकारलाच द्यायला हवे. गेली चार वर्षे फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली. हे आरक्षण देण्यात कुठेही मर्मस्थाने राहू नयेत म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली. या काळात, फडणवीस यांच्यावर कमी आरोप झाले नाहीत! त्यांची टर उडविण्यात आली. मराठा नेत्यांनी कटू टीका केली. जाणत्या राजाने त्यांची अप्रत्यक्षपणे जातही काढून पाहिली. लाखोंचे मूक मोर्चे निघाल्यावर, हिंसक आंदोलन करण्याचाही प्रयत्न झाला. यामुळे फडणवीस व्यथित झालेत, पण डगमगले नाहीत. त्यांनी शांतपणे सर्व सहन केले. त्यांनी वचन दिले होते की, मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचे आहे आणि मी ते देईनच. त्या वचनपूर्तीवर त्यांनी लक्ष केंद्रित ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे मराठा समाजाला मिळालेले हे १६ टक्क्यांचे आरक्षण आहे. मधल्या काळात, सरकारी नोकरीच्या जागा निघाल्या होत्या. त्यातील काही जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तर शंभर मार्ग असतात आणि हेतूच कुटिल असेल तर शंभर अडथळे असतात, हेच खरे! देवेंद्र फडणवीसांनी मात्र या यशाचे श्रेय सार्‍या महाराष्ट्रालाच देऊन टाकले आहे. सामाजिक प्रश्‍नावर महाराष्ट्र नेहमीच एकजूट होतो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे, असे त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण, म्हणून आम्ही कद्रुपणा दाखवू नये. आंदोलन म्हटले म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या उरात धडकीच भरते. कारण, आंदोलनाचा अनुभव प्रत्येकाच्या पदरी असतो. मराठा समाजाने मात्र या आंदोलनाच्या दाहक अनुभवाला फाटा देण्याचे काम केले आहे, हे मान्य करावेच लागेल. लाखो मराठ्यांचा मोर्चा निघत होता आणि तरीही कुठेही काहीही गडबड नाही, रहदारीचे तुंबणे नाही, तोडफोड-हिंसा नाही, कुठलाही राजकीय पुढारी मंचावर नाही… हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला नवीनच होते. त्याचे तमाम जनतेने स्वागत केले. आंदोलनाच्या नेतृत्वाला मनोमन सलाम केला. काहींना मात्र हे रुचले नाही. त्यांनी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते गालबोटच राहिले, संपूर्ण आंदोलनाचा तो स्वभाव होऊ शकला नाही. हे फार महत्त्वाचे आहे. आता यापुढे तरी, महाराष्ट्रात जी काही आंदोलने होतील, त्याचे मूल्यमापन करण्यासाठी मराठा समाजाचे हे भव्य मोर्चे आधार म्हणून निश्‍चितच घेतले जातील. आंदोलनाच्या रूढ संकल्पनेला एक नवे, सकारात्मक, आश्‍वासक वळण देण्यात मराठा आंदोलनाच्या नेत्यांना यश आले आहे, याचे निश्‍चितच अभिनंदन करायला हवे.
२०१९च्या निवडणुकीवर डोळा ठेवून फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला, असाही एक आक्षेप घेतला जातो. पण यात चूक काय? आपली लोकशाही व्यवस्था निवडणूककेंद्रित आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांवर, राज्य चालविण्यासोबतच पुढील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला निवडून आणण्याचीही अदृश्य जबाबदारी असते. विजयी होण्यासाठी बहुसंख्य मतांची गरज असते. त्यामुळे मतांसाठी निर्णय घेतला, म्हणून टीका करण्यात काही अर्थ नाही. कुठला नेता किंवा पक्ष मतांचे राजकारण करत नाही? दुसरा आक्षेप हा की, मराठा समाज खरोखर मागास आहे का? त्यांचे तर कितीतरी मुख्यमंत्री झालेत, संपूर्ण सहकार क्षेत्र, साखर कारखाने, सहकारी बँका, दूध डेअरी, शाळा, इंजिनीअरिंग कॉलेजेस मराठ्यांच्या ताब्यात असताना हा समाज मागास कसा? या प्रश्‍नाला उत्तर राज्य सरकारने स्थापन केलेल्या मागास वर्ग आयोगाने सविस्तर व पुराव्यानिशी दिले आहे. त्यामुळे आता याही आक्षेपाला काही अर्थ उरलेला नाही. मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. त्याचा त्यांनी सदुपयोग करावा. या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या समाजात जो मागासलेपणा रुजला आहे, तो समूळ नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. काहीच घराणी या आरक्षणाचा पिढ्यान्पिढ्या लाभ घेत आहेत, असे जे एक वास्तव अन्य आरक्षणाच्या बाबतीत दिसून येते, तसे या आरक्षणाचे होऊ नये, याची काळजी मराठा समाजाचे नेतृत्व (जे अराजकीय आहे, असे आम्ही समजतो) घेईल, अशी आशा आहे. जेव्हा एखादा समाज उन्नती करतो, तेव्हा ते राज्य, तो देशही अप्रत्यक्षपणे उन्नत होत असतो. त्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण दूर होण्यात महाराष्ट्राचेही भले आहेच. हा समाज मेहनती आहे, काटक आहे, प्रामाणिक आहे. त्याला आता प्रगतीच्या संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे यातून मंगल आणि अपेक्षित परिणामच येतील, असे वाटते. धनगर समाजालाही येत्या अधिवेशनापूर्वी आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हीदेखील एक शुभ घटना आहे. हा मुख्यमंत्री शब्द पाळणारा आहे. कुणीही कितीही विरोध केला, दबाव आणला, टीका केली, तरीही न डगमगता दिलेला शब्द पूर्ण करणारा आहे. आता मराठा समाजानेही अशा या मुख्यमंत्र्याच्या मागे, जुने राजकारण बाजूला सारून, पूर्ण ताकदीने उभे राहून आपल्या मनाचा उमदेपणा दाखवून दिला पाहिजे, अशी अपेक्षा करणे चूक ठरेल काय?

https://tarunbharat.org/?p=68730
Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (25 of 773 articles)


कुहीकर | ‘‘मी हिंदुवादी नेता नाही, तर राष्ट्रवादी नेता आहे. मी प्रत्येक धर्माचा, जातीचा, भाषेचा आणि प्रत्येक वर्गाचा नेता आहे. ...

×