ads
ads
मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

•वाराणसीत जय्यत तयारी सुरू •आज रोड शोद्वारे करणार शक्तिप्रदर्शन,…

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

•२७ सभांनी राज्यातही कमळजागर, नागपूर, २४ एप्रिल – भारतीय…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक » व्वा! विजय माल्या, व्वा!

व्वा! विजय माल्या, व्वा!

सुनील कुहीकर |

परम पूज्यनीय, परम आदरणीय, प्रात:स्मरणीय, ‘मद्य’प्रांतातील बहुतजनांचा आधारू, देशद्रोही, पळपुटे, कर्जबुडवे विजय माल्याजी… आपल्याला त्रिवार प्रणाम. हजारदा कुर्निसात. वाह उस्ताद वाह! मान गये आपको. राजे, आपल्यासारखे दुस्तुरखुद्द आपणच. तुलनाच नाही बघा आपली इतर कुणाशी. अरे, आहे कोणी माईचा लाल या देशात, जो कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ते न फेडता पळून जाण्याचे (सॉरी! इतरत्र निघून जाण्याचे!) धाडस दाखवू शकेल? तिथं जाऊन तमाम भारतवासीयांना वाकुल्या दाखवत बिनधास्त जगण्याची आपली तर्‍हाही तशी न्यारीच बरं का! तसाही तुमचा स्वभाव भारीच रॉयल. मनात काही काळंबेरं नसते तुमच्या. लोकहितार्थ उद्योग चालावा एवढाच आपला उदात्त हेतू होता. त्यासाठी पैसे कमी पडताहेत म्हटल्यावर तुम्ही बँकांना विचारणा केली. देता का थोडेसे पैसे उधार म्हणून! तर काय, झाडून सार्‍या बँकांचे अधिकारी रांगेत उभे राहिले दरबारात. सलाम ठोकत. आमचे कर्ज घ्या, आमचे कर्ज घ्या म्हणत. तुमची काय चूक? त्यांनी दिलं, तुम्ही घेतलं कर्ज. ते परतही करायचं असतं, हे निदान सांगायला तरी हवं होतं ना त्या अधिकार्‍यांनी तुम्हाला. ते विसरले सांगायला. त्यांना वाटलं, इतकी मोठी असामी. आपल्या बँकेतून कर्ज घेतेय् हेच तर उपकार झालेत आपल्यावर. त्याला, ‘‘बापू पैसे परत बी करजो’’, असं म्हणायला तो काय गरीब शेतकरी आहे, की हिडीसफिडीस करून कर्जाविना बाहेर घालवायला गरजू बेरोजगार आहे?… असा सखोल विचार करून या बँक अधिकार्‍यांनी तुम्हाला कर्ज दिलं. त्याची बक्षिसी त्या त्या अधिकार्‍याला तुम्ही त्या त्यावेळी नक्कीच दिली असणार. खरं ना? हो! तुम्ही काय असे कुणाचे उपकार घेणार्‍यातले थोडीच आहात. दिलखुलास, स्वाभिमानी व्यक्तिमत्व तुमचं. इतक्या मोठमोठ्या रकमांचे कर्ज विनासायास दाराशी आणून देणार्‍यांसाठी चार-दोन कोटी रुपयांची उधळण म्हणजे किस झाड की पत्ती…ती उधळण तुम्ही केली. तुम्हाला वाटलं एवढं केलं की पुरे. आता कर्जाला विचारतो कोण?
पण, हे बेटे सरकारी अधिकारी म्हणजे ना एकदम हुशार असतात. ताकास तूर लागू देत नाहीत अन् अंगावर तर काहीच येऊ देत नाहीत. एकवेळ नेते फसतील घोटाळ्यात. पण अधिकारी? छे! सारेकाही करून भागून, मामला साफ असतो यांचा. तर, सांगायचा मुद्दा असा की, अंगावर शेकणार म्हटल्यावर त्यांनी विनंती केली तुम्हाला कर्जाच्या परतफेडीसाठी. बरोबर आहे ना राव! वसुलीसाठी तगादा लावायला तुम्ही काय सामान्य व्यक्ती आहात? तगादा फक्त पाच-पंचेवीस हजाराचे कर्ज असलेल्या शेतकर्‍यांच्या मागे लावण्याची रीत आहे या देशातल्या बँक अधिकार्‍यांची. त्याला बेजार करून सोडण्याची, अगदी आत्महत्या करण्यापर्यंत त्याला त्रस्त करून सोडण्याची पद्धती तुमच्यासाठी थोडीच अंमलात आणणार होते ते! तुम्ही पण ना माल्या साहेब, उगाच पळून गेलात (सॉरी! निघून गेलात) देश सोडून. अहो, तुमच्या सारख्या बड्या धेंडांना हात लावण्याची हिंमत थोडीच आहे इथे कुणाची! तुम्ही नुसती इच्छा जाहीर करण्याचीच देर की, कर्ज न फेडताही ताठ मानेनं समाजात वावरता येईल अशी तजवीज केली असती, त्यांनी खास तुमच्यासाठी. आधीचे कर्ज फेडण्यासाठी नव्या अधिकच्या कर्जाची तजवीज केली असती, त्या हुश्शार मंडळींनी. पण त्यांना ‘सेवेची संधी’ न देता तुम्ही असे पळून गेलात अन् सारा देश हळहळला बघा! इकडून पळून गेल्यावरही तिकडे भारी चैन चालली आहे म्हणे तुमची? बँकांचे करोडो रुपयांचे कर्ज बुडवून बिनदिक्कतपणे देशाबाहेर पडू शकणारा हा ‘भला’ माणूस आहे तरी कोण, या प्रश्‍नाचे उत्तर लोक आज तुमचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून शोधताहेत. तसंही लोकांना भारीच कौतुक बरं तुमचं. हां, आता काही लोक कर्जबुडवा, लबाड, चोर, पळपुटा वगैरे म्हणून हिणवतात, पण नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. तसेही, कर्ज घेताना, बुडवताना, देश सोडताना कोणी अडवू शकलं नाही, तिथे आता कोण काय बिघडवून घेणार आहे तुमचं?
बँका लुटून देशाबाहेर पडल्यावर तिकडे तुमचं बरं चाललं असल्याचं कानी असताना परवा तुम्ही कर्जाची बिनव्याजी परतफेड करण्याची भाषा बोलल्याचे समजले. काय पण रुबाब साहेब तुमचा! मानलं बॉस आपल्याला. एवढं कर्ज बुडवलं तरी थाट मात्र साहेबीच राखला आहे आपण. म्हणालात, ते व्याजाचं एका शब्दानं बोलू नका! मुद्दल घेत असाल तर देतो. असेल तयारी तर बोला, नाही तर बसा बोंबलत.(हे शेवटचं वाक्य तोंडून बाहेर पडणार इतक्यात कोणीतरी शिंकलं अन् ते तसंच मनात राहिलं म्हणे तुमच्या!). व्याजाची एक दमडीही देणार नाही, असं म्हणतानाही काय मस्त साहेबी रुबाब दाखवलात आपण. वा. व्वा. लाज, शरम, खंत वगैरे बाळगायला आपण तसेही काही सामान्यजन नाही. छान केलंत बघा! या बँकवाल्यानांही ना अशीच अद्दल घडवायला पाहिजे होती कुणीतरी. ज्यांनी मुळात कर्ज घेऊनच बँकेवर थोर उपकार केले आहेत, त्या तुमच्यासारख्या असामीकडून काय परतफेडीची अपेक्षा ठेवायची? देशात इतके सारे इतर लाचार, गरजवंत, गोरगरीब लोक शेकड्याने पडलेले असताना चक्क तुमच्याकडून कर्जावरचे व्याज घ्यायचे? छे! छे! शोभते काहो बँक अधिकार्‍यांना हे? ज्या आवेशात तुम्ही खडसावून सांगितलं ना माल्या साहेब, त्या अधिकार्‍यांना. वाह! दिल खुश हो गया. प्रत्येक चोरानं आदर्श ठेवावा तो तुमचाच. चोर्‍या करूनही मुजोरी करावी ती तुमच्यासारखी. उलट्या बोंबा माराव्यात त्या तुमच्या सारख्या. काय तो करारी बाणा, काय ती ऐट, काय ती शान… हे खरे आहे की काही लोक त्याला उर्मटपणा, तर काही लोक माजोरेपण म्हणतात. पण, त्यांना काय ठावूक. कोट्यवधींचे कर्ज बुडवून वर पुन्हा असला शहाजोगपणा करायला काय मर्दुमकी लागते ती. हे कुण्या येरागबाळ्याचे काम थोडीच आहे…
व्याजबिज काही नाही, वाटल्यास मुद्दल देतो, असं ठणकावून बोललात, तरी लोकांना वाटलं नमलात तुम्ही. अरे हॅट. विजय माल्या काय असा ऐर्‍यागैर्‍यांसमोर झुकणारा माणूस आहे? नाहीच मुळी. कसा मस्त दम दिलात तमाम भारतीय लोकांना. नाही तर काय? त्या ख्रिश्‍चियन मिशेलचं बखुटं धरून भारतात आणल्याबरोबर तुम्ही भिलात अन् लागलीच, बुडीत कर्जाची मुद्दल द्यायला तयार झालात, असा ग्रह झालेल्या लोकांनाही मस्त चपराक दिलीत साहेब आपण. नाही तर काय, भिणार्‍यांची जमात असते ती वेगळीच. आपण तर चोर्‍या करून वर पुन्हा शिरजोरी करणार्‍यांच्या खेम्यातले. कर्ज बुडवून पळून गेलात म्हणून काय झालं, शिरजोरी तर केलीच पाहिजे ना. ती आपण मोठ्या शिताफीनं करताहात, हे बघून जनतेचा ऊर कसा अभिमानानं भरून आलाय् बघा! घेतलेल्या कर्जाची बिनव्याजी परतफेड करण्याचा जो अफलातून उपाय आपण शोधून काढला आहे, तो बघितल्यावर तर डोक्यावर घेऊन नाचतील लोक आपल्याला. हो! तुम्हालाच कशाला, प्रत्येकालाच मिळावी ना ही सुविधा. अर्थात, तुम्ही बँक अधिकार्‍यांचे जावई असल्याने प्राधान्यक्रमाने ती सर्वप्रथम आपल्या वाट्याला येईल हे खरे आणि योग्यही असले तरी, कर्ज फेडण्याची जबाबदारी टाळून देशाची सीमा ओलांडणार्‍या आपल्यासारख्या पळपुट्या बेईमानांना जर ही सोय उपलब्ध होऊ शकते तर मग ज्यांना खरोखरीच गरज आहे, त्या ईमानदार शेतकर्‍यांना का मिळू नये या ‘विशेष योजने’चा लाभ?
माल्या साहेब आपण एकदम ग्रेट आहात. एरवी, अशा जगावेगळ्या, देशबुडव्या कल्पना केवळ आपल्या सुपीक डोक्यातूनच उपजू शकतात. नाही तर, परिस्थितीमुळे बँकांचे कर्ज फेडता येत नाही म्हणून गळ्याभोवती आडावरचा दोर आवळणारा बळीराजा कुठे अन् बँका लुटूनही विदेशात चैन करणारे, विजय माल्या, निरव मोदी कुठे. कर्ज घेतले की ते फेडण्याला प्राधान्य देणारी त्यांची रीत कुठे अन् बुडवण्यासाठीच कर्ज घेण्याच्या मानसिकतेचे आपल्यासारखे धनी कुठे. ही परतफेड करतानाही व्याज माफ करवून घेण्याची भाषा अन् ती बोलतानाची, जणू काय बँकांवर उपकारच करीत असल्याची मुजोर आपली तर्‍हा तर त्याहून न्यारी….

https://tarunbharat.org/?p=69203
Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक (436 of 1611 articles)


मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांचे निकाल काय लागतील, याचे संकेत सध्या पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभांच्या निवडणूक निकालांवरून ...

×