ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » शेतकरीकेंद्रित साहित्य संमेलन

शेतकरीकेंद्रित साहित्य संमेलन

यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा वाद शमला आणि आता त्याचे उद्घाटन, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची पत्नीच्या हस्ते झाला. हे वाईटातून चांगले घडले, असेच म्हणावे लागेल. उद्घाटक वैशाली सुधाकर येडे यांना तर हा बहुमान मिळाल्याचे समजताच गहिवरून आले. मराठी साहित्याच्या या सर्वोच्च व्यासपीठावरून शेतकर्‍यांची आणि महिलांची, विशेषत: ग्रामीण महिलांची दयनीय स्थिती आपण मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून बोलावून एक चांगला पायंडा यवतमाळकरांनी पाडला आहे. आता यापुढच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कोण बोलवायचे, याची एक चांगली दिशा प्राप्त झाली आहे. हे या संमेलनाचे, ते प्रारंभ होण्यापूर्वीच प्राप्त झालेले शुभफळ आहे. शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात, लाखो रुपये खर्चून साहित्य संमेलन घेण्यात येऊ नये, या मागणीपासून ते, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन, असा हा प्रवास झालेला आहे. परंतु, शहाणपण उशिराच सुचते, असे जे म्हणतात ते काही खोटे नाही.
भारतातील लोकशाहीचा अभिमान बाळगणार्‍या तसेच भारतातील लोकशाही परिपक्व झाली आहे, असा डांगोरा पिटणार्‍या तमाम दांभिक साहित्यिकांमध्ये अग्रणी असलेल्या इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल, मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आल्या नाहीत, हे फार चांगले झाले. तसे पाहिले तर, या वामपंथी विचारवंतांना लोकशाहीचे काहीएक देणेघेणे नसते. परंतु, आपल्या साहित्यक्षेत्रावर या वामपंथी विचारवंतांची कृष्णछाया पडली असल्यामुळे, जिथे तिथे याच व्यक्तींचा बोलबाला दिसून येतो. मुळात अत्यंत असहिष्णुता, पराकोटीचा द्वेष, अहंकार ठासून भरलेला असतानाही या लोकांच्या तोंडून लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे शब्द आणि त्यांच्या व्याख्या इच्छा नसतानाही ऐकाव्या लागतात. यवतमाळ येथे संमेलनासाठी जमणार्‍या साहित्यरसिकांची या अशा ‘नकोशा’ अनुभवातून सुटका झाली आहे. दुसरेही एक अघटित घडले आहे. ज्या साहित्य महामंडळाने हे संमेलन यशस्वी पार पाडायचे असते, त्या महामंडळाच्या अध्यक्षांनी संमेलनापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. असे प्रथमच घडले असावे. कधी काळी प्रस्थापितांविरुद्ध जोमदार कविता करणारे आणि नंतर व्यवस्थित प्रस्थापित झालेले प्रगतिशील कवी या महामंडळाचे अध्यक्ष होते. मराठी साहित्यातील शिखर संस्थांचे नेतृत्व असलेल्या या व्यक्तीने आलेल्या (की स्वत:च निर्माण केलेल्या) संकटांचा धीरोदात्तपणे सामना करण्याऐवजी, सैन्याला मध्येच सोडून रणांगणातून पळ काढणार्‍या सेनापतीची भूमिका घेतली. असतो एकेकाचा स्वभाव. परंतु, हा असा पळपुट्या सेनापती विदर्भाचा निघावा, याचे वाईट वाटते.
संदीप कुंडलकर नावाचे आणखी एक महाभाग यावेळी प्रकाशात आले आहेत. एक-दोन चित्रपट दिग्दर्शित केलेले हे महाशय जरा जास्तच हवेत भरकटले आहेत. त्यांना म्हणे यवतमाळ कुठे हेच माहीत नाही! संमेलनाच्या निमित्ताने जो वाद झाला त्यावर या कुंडलकरांनी पोस्ट टाकली होती. त्यात ते म्हणतात- मला तर यवतमाळ कुठे आहे हेच माहीत नव्हते. ते आमच्या प्रणव सखदेवने समजावले. अशा अननोन जागी जाऊन भयंकर गर्दी करून भाषणे ऐकण्यापेक्षा ज्यांना भेटायचे आहे त्या लेखकांनी आणि कवींनी आपसात फोन करून पुण्या-मुंबईत किंवा चांगल्या निसर्गरम्य जागी जमून छोटी अनौपचारिक गेट-टू-गेटर्स केली तर जास्त चांगले होणार नाही का? भरपूर मोकळेपणाने लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसे येऊन गर्दी करायची काय गरज आहे? या कुंडलकरांची मळमळ नवीन नाही. या तिकडल्या लोकांना मुंबई, पुणे, नाशिक याच्यापलीकडेही महाराष्ट्र आहे, हे मान्यच करायचे नसते. जणूकाही उर्वरित महाराष्ट्र यांची वसाहतच आहे. तसे पाहिले तर ही मंडळी खूप काही प्रतिभेचे पंख लावून वगैरे आलेली नसतात. परंतु, जाहिरातबाजी अशी काही करतात की, इतरांना ही पोकळ माणसे भरीव वाटू लागतात. या अशा पोकळ माणसांचा व्यवस्थित समाचार आपल्या पद्धतीने घेण्यास वैदर्भीय जनता विसरणार नाही, याची खात्री आहे.
संमेलनात खरे महत्त्व संमेलनाध्यक्षांना असते. त्यांचेच भाषण महत्त्वाचे असते. बाकी सारे गौण. स्वागताध्यक्ष, उद्घाटक यांची भाषणे का म्हणून असावीत, कळत नाही. मुळात उद्घाटक हवाच कशाला? मावळत्या संमेलनाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करावे तसेच स्वागताध्यक्ष कुणीही असो, त्याला मंचावर बसण्याचाच केवळ मान द्यावा. भाषणाची संधी द्यायला नको. असे झाले तरच संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा मान आणि गांभीर्य राखता येईल. तसा बदल नेहमीसाठी केला तर फार बरे होईल. आता वैशाली येडे या संमेलनाच्या उद्घाटक आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या भाषणातून शेती, शेतकरी, ग्रामीण स्त्रिया यांचा विषय येणार. हा विषय साहित्यातून आला नाही असे नाही. परंतु, तो साहित्यिक शैली किंवा विश्‍लेषणांच्या माध्यमातून आलेला आहे. या परिस्थितीची स्वत: भुक्तभोगी आणि तीही एक महिला, जेव्हा आपले अनुभव आणि ग्रामीण भागातील वास्तव जगासमोर मांडेल, तेव्हा त्या कथनाला अतिशय महत्त्व असणार, याच शंकाच नाही. ती काही साहित्यक भाषेत ते मांडू शकणार नाही. परंतु, त्या निवेदनात सच्चेपणा असेल. हा सच्चेपणा उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतल्याविना राहणार नाही. अशा या भाषणाने शेतकर्‍यांच्या स्थितीत काही फरक पडणार आहे का, असले प्रश्‍न उपस्थित होणारच नाहीत असे नाही. परंतु, एक सर्वसामान्य ग्रामीण महिला, जिचा कदाचित साहित्याशी परिचयही नसेल, जेव्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करते, तेव्हा समस्त ग्रामीण महिलांचे ऊर अभिमानाने भरून येणार नाहीत का? नशिबाने आणि परिस्थितीने छळले, नको ते भोगायला लावले, परंतु समाजाने सन्मान दिला. ही कृतज्ञ शिदोरी तिलाच नाही, तर समस्त स्त्रीवर्गाला नेहमीसाठी पुरणार आहे. जिचा साहित्याशी काहीएक संबंध नाही अशा महिलेच्या हातून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करवून, ‘यवतमाळ कुठे आहे’ असे निलाजर्‍या तोंडाने विचारणार्‍यांचे गाल यवतमाळकरांनी चांगलेच रंगविले आहेत. याबद्दल यवतमाळकरांचे अभिनंदनच करायला हवे!
मराठीला चांगले दिवस कधी व कसे येणार, यावर काथ्याकूट करण्यापेक्षा, ज्यांना आपण मराठी साहित्यिक म्हणतो, त्यांचे प्रबोधन अधिक प्रमाणात व्हायला हवे. साहित्य संमेलनाला तुम्ही येता म्हणजे काही उपकार करत नाहीत. तिथे येणे तुमचे कर्तव्य आहे, असे खडसावून सांगण्याची परंपरा निर्माण झाली पाहिजे. काही झाले की लगेच बहिष्काराची भाषा करणार्‍यांना तर वेशीबाहेरच फेकून दिले पाहिजे. आम्ही पुण्या-मुंबईकडचे, आम्ही प्रतिभावंत साहित्यिक, आमचा मानसन्मान, सर्व अक्कल फक्त आम्हालाच दिली आहे… ही असली थेरे करणार्‍यांना आधी वठणीवर आणण्याचे काम झाले पाहिजे. मराठीची दुर्दशा होण्यास हीच मंडळी खरी कारणीभूत आहेत. हा तोरा दाखविणार्‍या एकाचेही साहित्य कालजयी नसते. तसे असते तर हा तोरा मोरपिसासारखा शोभून तरी दिसला असता. त्यामुळे मराठीचे काय करायचे ते नंतर बघून घेऊ, आधी या लोकांना जमिनीवर आणण्याचे काम झाले पाहिजे. यवतमाळच्या साहित्य संमेलनात या दृष्टीनेही काही मार्गदर्शन झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

https://tarunbharat.org/?p=72287
Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (128 of 843 articles)


कुहीकर | तिकडे विदेशी नागरिकांचे लोंढे थांबवण्यासाठी इरेला पेटलेल्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेत आणिबाणी जाहीर करण्याची धमकी सार्‍या देशाला दिलेली असताना, आपल्या ...

×