ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » शेतकर्‍यांवर निबंध…

शेतकर्‍यांवर निबंध…

कधीकाळी शालेय जीवनात निबंध असायचे. आताही असतील. म्हणजे निबंधाच्या ऐवजी आता एसए असतात. आता सहज म्हणून हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शेतकरी या विषयावर निबंध लिहायला दिला. त्यातून शेतकर्‍यांविषयी एक वेगळीच दृष्टी लाभली आहे. त्यात पुन्हा आजच्या अगदी सातवी- आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही कसा पोलिटिकल आणि इतरही आस्पेक्ट असतो, याचाही साक्षात्कार झाला. (टीप : मधे मधे जे काय आंग्ल वाटणारे शब्द येत आहेत ते वास्तवात आता मराठीच आहेत. कारण, मराठीतही त्यांना पर्यायी शब्द एकदम कडक मराठी लोकांनाही आठवत नाहीत. मध्यंतरी एका मराठी वृत्तपत्राने मराठी साहित्यिकांची परिषद घेतली त्याला त्यांनी नावच ‘मराठी लिटररी फेस्ट’ असे दिले होते. तर सुज्ञास अधिक सांगणे नको.) तर सांगायचे हे की त्यातला एक मस्तपैकी निबंध वाचकांना वाचायला जसाच्या तसा त्याच्याच ‘लँग्वेज’मध्ये देण्याचा हा आटोकाट प्रयत्न आहे. इथून पुढे त्या अनाम विद्यार्थ्याचा हा निबंध आपण वाचावा- ‘शेतकरी हा दिसायला अगदीच माणसांसारखाच असतो. म्हणजे ही हॅव टू नोज, आईज, इयर्स, हँडस्, लेग्ज… म्हणजे तो डिट्टो माणसांसारखाच. तो व्हिलेजात राहतो. तो शेती करतो. म्हणून त्याला शेतकरी म्हणतात. तो धान्य पिकवितो, असे म्हणतात. म्हणून त्याला अन्नदाताही म्हणतात. मात्र मी पाहिलेल्या सगळ्याच शेतात फार्मर्सनी व्हीट, ज्वार, मका अ‍ॅण्ड तांदूळ लावलेला नव्हता. त्याने कापूस अन् सोयाबीनच लावले होते. याचा अर्थ शेतकरी कापूस आणि सोयाबीनच खात असावा… शेतकरी हा देशाचे भांडवल निर्माण करत होता, असेही आमचे फोरफादर्स सांगायचे. माझे ग्रँडपा तर शेतकर्‍याला बळिराजाच म्हणायचे. तो देशाला अन्न देतो, फॅक्टरीला कच्चा माल देतो, असे ग्रँडपा सांगायचे. आता त्या दिवशी मी ऑनलाईन न्यूजपेपर वाचत होतो. थोडं पर्सनली सांगायचं तर माझे पपा कागदी न्यूजपेपर वाचतात. ते फारच बॅकवर्ड वाटतं. ते तसे न्यूजपेपर हातात घेऊन वाचत असताना माझे फ्रेंडस्, खास करून गर्लफ्रेंड आली तर मला फारच ऑक्वर्ड होतं. मला तर ऑनलाईनच वाचता येतं. प्रिंटेड असं काही वाचता येत नाही अन् वाचलं तर ते मेमरीत जात नाही. तर मी त्या दिवशी ऑनलाईन न्यूज वाचत होतो तर त्यात दिलं होतं की आजकाल शेतकरी हा भांडवल निर्माण करत नाही. आपल्या कंट्रीच्या इन्कममध्ये त्याचा वाटा आता कमी असतो. म्हणजे तो काही कॅपिटल निर्माण करत नाही. तरीही मग देशाच्या कॅपिटलमध्ये त्याच्यासाठी मोठमोठे पोलिटिशियन्स का राडा करत असतात? इतरवेळी बड्या इंडस्ट्रीयल टायकूनशीच बोलणारे हे लीडर्स अधून मधून शेतकर्‍यांसाठी का रस्त्यावर येतात? शेतकर्‍यांचं लोन कॅन्सल करा, त्यांना नवीन लोन द्या, त्यांच्या मालाला भाव द्या, अशा मागण्या असतात. लोन तर सगळ्यांवरच असतं. माझ्या पप्पांवरही आहे. इएमआय मंथली भरता यावा म्हणून त्यांनी सॅलरी अकाऊंट लोनला अटॅच केली आहे. शेतकर्‍यानंही ते तसं करायला हरकत नाही. त्यांना काही अडचण असेल तर मग त्यांच्यासाठी सरकारला त्रास देणार्‍या या लीडर्सनी त्यांना मदत करावी. मला माझ्या एका फ्रेंडने सांगितले की, हे आता शेतकर्‍यांसाठी भांडणारे पोलिटिशियन्स आधी गव्हर्नमेंटमध्ये होते. ते कोण… हं, शरद पवार तर म्हणे अ‍ॅग्रिकल्चर मिनिस्टर होते. टेन इयर्स ते हाच पोर्टफोलिओ बघायचे. मग त्यांनी काय केले. तेव्हा शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा ते काय ते, हं उत्पादन खर्चावर आधारित भाव का नाही दिला? आता ते म्हणतात म्हणे की शेतकर्‍यांना वन अ‍ॅण्ड हाफ टक्के त्यांच्या मालाला भाव द्यायला हवा. परवा दिल्लीला शेतकर्‍यांचा मोठ्ठा मोर्चा निघाला. मोठ्ठा म्हणजे इतका बिग की ‘ठ’ला आणखी एक ‘ठ’ लावतात त्यासाठी मराठीत. त्यात सगळेच आता गव्हर्नमेंट मध्ये नसलेले, निवडणुकीत हरलेले अन् आता पुन्हा जिंकण्याची काही होप नसलेले सगळेच पोलिटिशियन्स होते असे म्हणतात. खरेतर हा मोर्चा लेफ्टिस्टचा होता. आपल्या देशात असे पोलिटिशियन्स आहेत. लेफ्टिस्ट अ‍ॅण्ड रायटिस्ट… आता हातावरून काय वेगळे व्हायचे? माझा एक फ्रेंड आहे. तो लेफ्ट हँडेड आहे; पण आमची छान फ्रेंडशीप आहे. मात्र हे पोलिटिक्स मध्ये असे आहे. काही लेफ्टी अन् बरेचकाही मिडल असतात. ते कंडिशन काय आहे ते पाहून इकडे जायचे किंवा तिकडे जायचे, हे ठरवितात. हे शरद पवार असेच आहेत, हवा पाहून तिवा मांडतात, असे त्या दिवशी चौकात काही मोठी माणसं बोलताना मी ऐकलं. कारण ते चान्स पे डान्स करतात. मग पॉलिटिक्स शिकायला त्यांच्याकडे जावेच लागेल. कारण आमच्या शाळेत खृूप पॉलिटिक्स आहे. आपल्याला ते जमत नाही. त्यामुळे आपण मागे राहतो. शरद पवार आम्हा लहान मुलांनाही पॉलिटिक्स शिकवितील काय? कारण आपले पंतप्रधान मोदीही म्हणाले होते की, ‘पवारांचे बोट पकडून मी राजकारणात आलो ; पण मोदी या पवारांसारखे डर्टी पॉलिटिक्स तर नाही करत. कदाचित मोदींना त्यांनी आपल्या गावाला बोलावले होते म्हणून मोदी गुड पर्सन असल्याने ते त्यांच्याविषयी असे बोलले असतील. माझे पपा तर म्हणाले की मोदींनी पवारांकडून राजकारण कपटाचे कसे करू नये, डर्टी पॉलिटिक्स कसे करू नये, हेच शिकले असावेत… पपांचे खरेच असावे. पवार शेतकर्‍यांसाठी दिल्लीच्या मोर्चात अन् तोही लेफ्टिस्टचा असतानाही गेले. शेतकरीच आता सत्ता परिवर्तन करतील, असे म्हणाले. शेतकरी सत्ता परिवर्तन करत असतील तर पवारांना सत्तेतून बाहेर शेतकर्‍यांनीच केले असावे ना? मला हा प्रश्‍न माझ्या टीचरला विचारायचा आहे. त्या कधीकाळी अण्णा हजारेंमुळे केजरीवाल यांच्या फॅन होत्या. नंतर मात्र मॅडम म्हणाल्या की हा माणूस (केजरीवाल) होपलेस आहे… तोही या मोर्चात सामील झाला होता. कधीकाळी हे लेफ्टिस्ट काँग्रेसच्या मागे सरकारात जायचे म्हणतात. आता ते कोण, राहुल गांधी यांच्या मागे फिरतात. त्यांची पार्टी तर आता पूर्ण बुडणार, असे मोठे लोक म्हणतात. तेही या मोर्चात सामील झाले होते. त्यांची पार्टी तर म्हणे देशात खूप वेळ गव्हर्नमेंटमध्ये होती. मग त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न का सोडविले नाही? मला असे वाटते की शेतकरी हा कॅपिटल निर्माण नाही करत; पण तो हरलेल्या पोलिटिशियन्साठी भांडवलच असतो. त्याचा युज करता येतो. म्हणजे शेतकर्‍यासाठी पोलिटिशियन्स युजलेस आहे, पण पोलिटिशियन्ससाठी शेतकरी मात्र युजफुल आहे. त्याचा युज करून सत्तेत यायचे अन् मग त्याला फेकून द्यायचे… त्यामुळे शेतकरी फॉर्मर आहे. कारण त्याचा वापर करून लोकांना गव्हर्नमेंट फॉर्म करता येते… म्हणून पोलिटिशियन ‘जय किसान’ म्हणतात; पण सत्तेत नसताना. शेतकरी भाबडा आहे, तो यांना पावतो दरवेळी, असे माझी ममा म्हणाली. शेतकर्‍यांनी हे भाबडेपण सोडून द्यावे, इतकेच मी लास्टला सांगेन!’
असा हा निबंध! कसा वाटला ते कळवा.

https://tarunbharat.org/?p=68803
Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (279 of 912 articles)


तोरसेकर | महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ काँग्रेसनेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना खूश करण्यासाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निंदा करणे ...

×