ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय » शेती, माती, गावगाडा बदलताना…

शेती, माती, गावगाडा बदलताना…

श्याम पेठकर |

तटस्थपणे जगाकडे आणि जगण्याकडे पाहण्याची थीअरी काय असली पाहिजे? तटस्थ आणि स्थितप्रज्ञ यात फरक आहे. ‘नसे दु:खात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा, भय-क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी…’ असे विनोबांनी गीताईत सांगितले आहे.
दु:खाचा उद्वेग नको आणि सुखाची लालसा नको… तरीही मग दु:ख आणि सुख या अवस्था आहेत, हे मान्य केलेले आहेच. ‘राशोमान’ या अकिरा कुरोसोवा या महान चित्रपट दिग्दर्शकाच्या चित्रपटाबद्दल मागेही एका लेखात विवेचन केले होते. एखादी घटना, प्रसंग आणि मग आयुष्यही केवळ असते. त्याची सुख-दु:ख, चांगले-वाईट, पाप-पुण्य अशी वर्गवारी आपण करत जातो. ती आपल्या गरजा आणि आयुष्याकडे आपण कसे पाहतो, त्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा दृष्टिकोन तयारच होतो मुळात आपल्यावर झालेल्या संस्कारांनी. मुळात आयुष्याची अन् घटनांची अशी वर्गवारी करणेच चूक आहे. ते नुसते असते. पांढरे-काळे असे काहीच नसते. घटना घटनाच असते. ती चूक, बरोबर, सत्य, असत्य, चांगली-वाईट असे काहीच नसते. त्यांच्याकडे आपण आपल्या मितीतून पाहतो म्हणून आपण त्यांवर आपले शेडस् थापत असतो. दृष्टिकोन लादत असतो. साप सापच असतो. तो घातक आहे, उपयोगाचा आहे, हे आपण ठरवितो. मुळात तो केवळ साप असतो. त्याच्या योनीतल्या प्राण्यांसाठी तो केवळ एक त्यांच्यासारखाच प्राणी असतो… ‘राशोमान’ची थीअरी हीच आहे. अर्थात ती कथालेखक रीनोसुके अकुटागवा यांची आहे. जपानी लघुकथेचा पितामह मानतात त्याला! अफलातूनच आहे हे. आयुष्याकडे पाहण्याचा नितळ, पारदर्शक असा दृष्टिकोन देणारीच थीअरी आहे ही. स्थितप्रज्ञतेच्याही पलीकडे नेणारी ही दृष्टी आहे. स्थितप्रज्ञ होण्यासाठी आधी सुख आणि दु:ख या अवस्था आहेत, हे मान्य केलेले आहे. मग त्याच्या लालसेतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला आहे. सुख, दु:ख असे काहीच नसते. आयुष्य हे केवळ आयुष्य असते. घटना ही केवळ घटनाच असते, इतकेच काय ते. अशा दृष्टिकोनातून पाहिले की मग उद्वेग आणि लालसा निर्माण होण्याचे काही कारणच उरत नाही…
मागच्या आठवड्यात नागपुरात अ‍ॅग्रो व्हिजन झाले. गेली दहा वर्षे ते होते आहे. आता त्याला मध्य भारतातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. शेती, माती आणि मग गावगाडा यात झालेल्या बदलांचा यथार्थ स्वीकार या ठिकाणी दिसतो. या वर्षी शेतीच्या पद्धतीत आणि संस्कृतीत झालेले बदल मोठ्या प्रामाणात दिसले. मग शेतीसमस्यांमुळे होणार्‍या आत्महत्यांची आठवण हकनाक आलीच. कर्जामुळे, आर्थिक ओढाताणीमुळे आत्महत्या होतात, असा पहिला निष्कर्ष आहे. मुळात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा शोध गेली चार-पाच दशके घेतला जात आहे आणि त्यावर उपायही केले जाण्याचा प्रयत्न होतो आहे. शेतकर्‍यांना मदतही करण्याची भावना विकसित होते आहे. कधीकाळी अव्वल शेती असलेली, आता मात्र शेतकरी बिच्चारा झालेला आहे. मग कधी कर्जमाफी केली जाते, त्यांना भाव वाढवून देण्याची, उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची मागणी होते आणि कधी मग वैतागून शेतकर्‍यांचीच कशी चूक आहे, हेही म्हटले जाते. सोदाहरण पटवून देण्याचा प्रयत्नही केला जातो, तरीही आत्महत्या काही थांबत नाहीत.
शेतकर्‍यांच्या आत्महत्या या केवळ आर्थिक कारणांनीच होत आहेत, असे नाही. मुळात त्यामागे सांस्कृतिक भाव अधिक आहे. व्यवहारापेक्षाही भावना जास्त आहेत. शेती ही संस्कृती होती. आता ती नाही. गावखेडे म्हटले की आपण स्मरणरंजनात जातो. त्या काळचे टुमदार, नैसर्गिक असे गाव डोळ्यांसमोर येते. हिरवीगार डवरलेली शेते आणि दान पावलं मागत सकाळी येणारा वासुदेव डोळ्यांसमोर येतो. ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं…’ म्हणत नवर्‍यासाठी शिदोरी घेऊन येणारी पार्वती येते डोळ्यांसमोर. आता ते सारं पुसलं गेलं आहे. कुडाला माती असलेली घरे आता खेड्यातही नाही. खेड्यातल्या माणसांचे भावजीवनही बदलले आहे, कारण गावजीवन बदलले आहे. बाजारीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खासगीकरणाचे हे बदल आहेत. त्याचेच हे परिणाम आहेत. ते वाईट, चांगले असे नाही. ते आहेत. हे बदल पचविण्याचा प्रयत्न केला जातच नाही, असेही नाही. आमराया नष्ट झाल्या. आंबे हे वाटून दिले जात होते. ताक तर वाटलेच जात होते आणि ताकालाही किंमत आली आहे आणि आकर्षक पॅकमध्ये ताकही चांगल्या किमतीला विकले जात आहे. हे बदल व्यावसायिक आहेत. बदल केवळ एकाच क्षेत्रात होतात, असेही नाही. ते कुठल्याही क्षेत्रात होत असले, तरीही त्याचे पडसाद सार्‍याच क्षेत्रांत उमटत असतात. त्यांची वर्गवारी, प्रतवारी करण्यात काही अर्थ नाही. ते आहेत. चांगले, वाईट असे काहीच नाही. बदल केवळ बदल आहेत. जुने ते सगळेच चांगलेच होते आणि नवे जे काय होते आहे, ते वाईटच आहे, ही भावनाच मुळात चूक आहे. ‘आता आधीसारखं काहीच राहिलं नाही,’ असे सुस्कारे टाकले जात असतात. ते सार्‍याच बाबत असतात. शिक्षण, कला, गाव, संस्कृती, सण आणि ते साजरे करण्याच्या पद्धती… सार्‍याच बाबत बदल होत आहेत. होत राहणार आहेत. त्या बदलांशी जुळवून घेतच मानवी जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. मानवीच कशाला, एकुणातच सजीवांच्या जीवनाचा प्रवाह बदल स्वीकारूनच समोर जात असतो. बदलांशी जो अडला तो मेला… शेतकरी असेच मरत आहेत. अर्थात, नव्याचा डोळसपणे स्वीकार करायला हवा. नवे तेच चांगले, असेही नाही. तरीही शेती, माती आणि गावगाडा यात बदल झाले आहेत. बालपण चांगलंच असतं, पण ते नेहमी भूतकाळ असतं. ज्याचं वर्तमान बाळ असतं त्यांना त्यातली गंमत कळत नाही. तरुणपण मग काय वाईट असतं? बालपण सरून गेल्याच्या दु:खात तरुणपण निसटून जात असतं. ‘‘शेतकर्‍यांनी नवे स्वीकारावे ना,’’ असे एकदा नितीन गडकरी बोलताना म्हणाले होते. गाव, शेती यांच्या जुन्या संस्कृतीशी घट्ट नाते सांगणार्‍या मनाला ते तेव्हा कसंसंच वाटलं होतं; पण आताचे अ‍ॅग्रो व्हिजन पाहताना हे जाणवलं की ती संस्कृती होती, पण आताचीही एक संस्कृतीच आहे ना! बदलाशी जुळवून घेतले नाही, तर मग संपावेच लागत असते. आता पाणी कमी आहे, तर कमी पाण्याची शेती करण्याचे तंत्र आपोआपच विकसित होत जाईल. तशी पिकं घेतली जातील. परंपरागत पिकं बाजूला सारून आता फुलांच्या झाडापासून फर्निचरसाठी अत्यंत आवश्यक असणार्‍या कुठल्याशा त्या लाकडाचीही शेती आता दक्षिण भारतात केली जात आहे. ती आता आपल्या इकडेही केली जाऊ लागली आहे. समस्या ज्या क्षेत्राची आहे, तेच क्षेत्र त्यावर नकळत उपायदेखील शोधून काढील. हाच निसर्ग आहे. आपल्या आयुष्यात असणारी माणसंही बदलत असतात. ते बदल आपल्याला खुपणारे असले की मग वाईट वाटतात. असे बदलणे हे त्यांचे पर्यावरण असू शकते. तुम्हाला हवी तशीच ती माणसे कशी काय असणार? सापांसारखी उद्या माणसंही विषारी होऊ शकतात. ती केवळ विषारीच असतील. म्हणजे वाईट असतील किंवा चांगली असतील, असे नाही. या अवस्था स्वीकारल्या की आणि राशोमान थीअरीने जगाकडे, आसपासच्या माणसांकडे अन् बदलांकडे पाहिले की, मग त्रास होत नाही. राशोमान थीअरी कळली आणि अशाच काही माणसांच्या बदलांच्या त्रासातून मुक्ती झाली. अब्बास दाना बडौदी म्हणतो तेच खरे-
‘मौसमके साथ साथ बदल जाना चाहिये
खुशियाँ न हो तो फिर गमसे बहल जाना चाहिये
जिस रोशनी मे ठीकसे आँखे न खुल सके
उस रोशनीसे दूर निकल जाना चाहिये…’

https://tarunbharat.org/?p=69011
Posted by : | on : 5 Dec 2018
Filed under : उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय (153 of 793 articles)


जी-२० परिषदेत जगातील नेते एकत्र आलेले असताना, फ्रान्सच्या रस्त्यांवर तिथली संतप्त जनता जाळपोळ करीत सुटलेली आहे. वाढती महागाई आणि न ...

×