ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » सत्तासुंदरीसोबत फारकत का घेत नाही?

सत्तासुंदरीसोबत फारकत का घेत नाही?

‘‘रोडरोमिओसारखे मागे का लागता, आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही,’’ असे सांगणारी शिवसेना रोडरोमिओपासून फारकत का घेत नाही, हा या राज्यातील सामान्य जनतेला पडलेला प्रश्‍न आहे. भाजपाला रोडरोमिओ म्हणणारी शिवसेना स्वत:ला काय जगतसुंदरी समजते आहे की काय? रोडरोमिओ कुणाच्याही मागे लागत नाहीत. दिसायला सुंदर असणार्‍यांच्याच ते मागे लागतात, हे माहिती असूनही सेनेचे नेते भाजपाला रोडरोमिओ म्हणत असतील, तर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही! सेनेच्या ज्या नेत्याने थेट जनतेमधून कधी निवडणूक लढवली नाही, मातोश्रीच्या कृपाप्रसादाने मागच्या दाराने राज्यसभेत प्रवेश करणारा नेता स्वबळाची भाषा बोलून सेनेला खड्ड्यातच खालायला निघाला असेल, तर रोडरोमिओने छेड काढण्याचीही आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह लातूरला असताना भाजपाच्या पदाधिकार्‍यांपुढे बोलत होते. त्यांनी सेनेला गर्भित इशारा दिला होता. मित्र सोबत आला तर त्याला जिंकवू आणि नाही आला तर पटकनी देऊ, असे शाह बोलले. काय चूक बोलले हो? तुम्हाला सोबत घ्यायला ते तयार आहेत, निवडणुकीत सर्व प्रकारची मदतही करायला तयार आहेत, असे असतानाही तुम्ही कायम स्वबळाची भाषा बोलणार असाल, तर भाजपाध्यक्षांनाही निर्वाणीचीच भाषा बोलावी लागेल.
एकीकडे तुम्हाला सत्तासुंदरीसोबत चाळेही करायचे आहेत आणि दुसरीकडे बदनामी होऊ नये म्हणून काळजीही घ्यायची आहे, हे जनतेला कळत नसेल असे समजण्याचे कारण नाही. भाजपाला सतत शिव्या घालणार्‍या शिवसेनेने आता सत्ता सोडण्याची वेळ आली आहे. नुसती स्वबळाची भाषा बोलून उपयोग नाही. सेनेत धमक असेल तर सेनेने तत्काळ सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. ज्याच्याशी पटत नाही, त्याच्यासोबत संसार करणे म्हणजे स्वत:चे वाटोळे करून घेण्यासारखे आहे. सेनेला स्वत:चे भले करायचे असेल तर वेगळा संसार थाटला पाहिजे. पण, सेना तसे करणार नाही. कारण, त्यासाठी नैतिक आणि आत्मिक बळ असावे लागते. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी-लाट होती. त्या लाटेत सेनेचे पडणारे उमेदवारही निवडून आले होते, याचा विसर सेनेला पडला असेल, तर २०१९ च्या निवडणुकीत सेनेने स्वत:ला आजमावूनच बघावे. विदर्भातून निवडून आलेले एक खासदार तर निवडणुकीपूर्वी मोदींची एक सभा मिळावी यासाठी भाजपा नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवत होते. त्या वेळी का नाही त्यांनी पक्षप्रमुखांना सभेला बोलावले? पक्षप्रमुखांच्या राजकीय क्षमतेवर त्यांचा विश्‍वास नव्हता काय? मोदींनी घेतलेल्या सभेनंतर त्यांच्या मतदारसंघातले वातावरण बदलले आणि ते निवडून आले होते. पण, नंतर तेच खासदार महाशय कृतघ्न झाले. थेट मोदींविरुद्ध बोलायला लागले. निवडून येण्याचीही पात्रता नसताना आपण मोदींमुळे निवडून आलो आहोत, याचा विसर पडलेल्या या खासदाराला २०१९ च्या निवडणुकीत आता जनताच पराभवाची चव चाखवणार, यात शंका नाही! आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली नाही तर सेनेची काय गत होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण, सध्या स्वत:च्या क्षमतेबाबत शिवसेना जास्तच आश्‍वस्त झालेली दिसते आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती हिंदुत्वाच्या एकमेव मुद्यावर झाली आहे. ती कायम राहावी अशी भाजपाची इच्छा आहे. पण, सेनेचे नेते उगाचच ताणून धरत आहेत. लातूरमध्ये अमित शाह यांनी म्हटल्याप्रमाणे, भाजपा सेनेला सोबत घ्यायला तयार आहे. पण, याला सेनेचा नेता रोडरोमिओ म्हणत असेल, तर प्रेमवीर वेडा होण्याऐवजी स्वत:ला विश्‍वसुंदरी समजणारेच वेडे होतील, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. जळगाव खान्देशमधील सेनेचा एक नेता तर दादागिरीची भाषा वापरत आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पहिलवानांच्या नादी लागू नये, अशी शिवराळ भाषा वापरणारा हा नेता काय लायकीचा आहे, हेही राज्यातील जनतेला माहिती आहे.
राज्यात भाजपाच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचे नेते मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून खिशात राजीनामे घेऊन फिरत आहेत. त्यांच्या राजीनाम्याचे कागद एव्हाना फाटायला आले असतील, मळकट-कळकट झाले असतील. सेनेचे वरिष्ठ नेते स्वबळाची भाषा वारंवार वापरत असताना सेनेचे सरकारमधील मंत्री नेमकी कशाची वाट पाहात आहेत? राजीनाम्याचे जीर्ण झालेले कागद राज्यपालांकडे सोपवत का नाहीत? शिवसेना स्वबळाचा फक्त नारा देत आहे. स्वबळावर लढल्यास काय हाल होतील, हे अनेक आमदार-खासदारांना माहिती आहे. त्यामुळे त्यांची भाजपाशी फारकत घेण्याची इच्छा नाही. पण, भाजपावर दबाव आणण्यासाठी ते कायम स्वबळाची भाषा करतात, अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. आतले चित्र मात्र वेगळेच आहे. जर का भाजपासोबत युती केली नाही किंवा सरकारमधून बाहेर पडलो, तर पक्षातील आमदार-खासदार फुटून भाजपात तर जाणार नाहीत ना, अशी भीती कदाचित शिवसेनेला सतावत असावी. पक्षातील फुटीच्या भीतीपायीच सेना सत्तेतून बाहेर पडत नसावी, अशी चर्चा राज्यात अनेक दिवसांपासून आहे. अन्यथा, ज्याच्याशी पटतच नाही, रात्रंदिवस शिव्याच घातल्या जातात, त्याच्यासोबत संसार करण्याची सेनेला आवश्यकता काय?
शिवसेनेने सरकारमध्ये राहण्यास भाजपाची ना नाही. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या कुणाचीही ना नाही. असे असतानाही शिवसेना सतत भाजपाला शिव्यांची लाखोली वाहते, याचेही आता लोकांना आश्‍चर्य वाटेनासे झाले आहे. शिवसेनेने आता जनतेमधला संभ्रम दूर करायला पाहिजे. सत्तेतून बाहेर का पडत नाही, याचा खुलासा तरी केला पाहिजे वा सत्तेतून बाहेर तरी पडले पाहिजे. दिवसेंदिवस शिवसेनेची प्रतिमा डागाळत चालली आहे. कितीही रेटून बोलले, तरी खोटे बोललेले जास्त दिवस पचत नाही, हे सेनेने लक्षात घेतले पाहिजे. घरसंसार टिकवायचा असेल तर प्रसंगी तडजोडी या स्वीकाराव्याच लागतात. पण, प्रमुखपदी बसलेल्या धृतराष्ट्राने फौजेतील कौरवांच्या चुकांकडे सतत कानाडोळाच केला तर निकाल काय लागतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘हटाव लुंगी, बजाओ पुंगी,’ असा नारा देत मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी सेना आता मराठीपासून फारकत घेताना दिसत आहे. मराठीच्या मुद्यावर तर सैनिक आणि सेनापती कुठे लढतानाच दिसत नाहीत. भाजपाची साथ सुटली तर मुंबईच्या महानगरपालिकेत काय गत होईल, हे सेनेला वेगळे सांगावे लागेल का? भाजपासोबत राहून भाजपाला मोठ्या भावाचा मान देऊन सेनेने स्वत:च्या पोळ्या शेकून घेण्यातच भले आहे. मुंबईची महापालिका शिवसेनेसाठी जीव की प्राण आहे! हा प्राण गमवायची सेनेची तयारी आहे? ऊठसूट मित्रपक्षावर टीका करण्याऐवजी, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या परंपरागत शत्रूंवर हल्ले करायला नकोत? शिवसेना संपलेली तर काका-पुतण्याला हवीच आहे. काका-पुतण्याचे ऐकून पक्षप्रमुखांना सल्ला देऊन ‘गार’ करणार्‍यांपासून पक्षप्रमुखांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखांनी त्यांच्या आमदार-खासदारांना एकेक करत बोलवावे, त्यांचे म्हणणे काय आहे ते ऐकावे, त्याचप्रमाणे ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनाही बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी. असे झाले तर धारणा व वस्तुस्थिती यातील अंतर त्यांच्या लक्षात येईल.

https://tarunbharat.org/?p=72081
Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (138 of 847 articles)


पेठकर | संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सार्वत्रिक निडणुकांच्या आधीचे हे अखेरचे अधिवेशन म्हणून त्याला तसे खास महत्त्व आहे. त्रिवार ...

×