ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » सलग १४९७ दिवस

सलग १४९७ दिवस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळून ७ डिसेंबरला ४ वर्षे १ महिना व ७ दिवस पूर्ण केले आहेत. सलग इतके दिवस या पदावर राहिलेले ते महाराष्ट्रातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. या आधी पुसदचे वसंतराव नाईक यांनी ११ वर्षे २ महिने १५ दिवस सलग मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. ५ दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसचे विलासराव देशमुख (४ वर्षे १ महिना ३ दिवस) हे क्रमांक दोनवर होते. परंतु, आता त्यांना मागे टाकून देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. या त्यांच्या विक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. पुरोगामी, प्रगतिशील आणखी काय काय बिरुदे लावणार्‍या या महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत १८ व्यक्ती मुख्यमंत्री झालेत. परंतु, त्यातील वसंतराव नाईक सोडले तर एकाही मुख्यमंत्र्याला आपला ५ वर्षांचा कार्यकाळ सलगपणे पूर्ण करता आला नाही. ही राजकीय अस्थिरता मोडून काढण्याच्या दिशेने आता देवेंद्र फडणवीस यांची दमदार वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत कधी साधे मंत्रीही न राहिलेले तरुण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा लोकांना वाटले की, एक-दीड वर्षांत यांची बोळवण होणार. पाठीशी पूर्ण बहुमत नाही, अत्यंत बेभरवशाचा सहकारी शिवसेना पक्ष, नागपुरी भाषेत ज्याला घाघ म्हणतात असे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष असताना, मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे सांभाळणे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हते. या अत्यंत संघर्षमय काळात देवेंद्र फडणवीस यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींची मुख्यमंत्रिपदाची एकत्रित कारकीर्द तपासली तर, देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वसंतराव नाईक (११ वर्षे ७७ दिवस), विलासराव देशमुख (७ वर्षे १२३ दिवस), शरद पवार (६ वर्षे २२१ दिवस) व शंकरराव चव्हाण (४ वर्षे १९० दिवस) हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या लोकांचा हाही विक्रम देवेंद्र फडणवीस भविष्यात मोडतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! किती काळ राज्य केले, यापेक्षा राज्यकारभार कसा चालवला, हेही महत्त्वाचे असते. याही बाबतीत देवेंद्र फडणवीस कसोटीवर उत्तमरीतीने उत्तीर्ण झाले आहेत, यात शंकाच नाही. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आजतागायत १४९७ दिवसांत, एकही दिवस लोकहिताची कामे केली नाहीत, असा गेला नाही. पहिल्या दिवसापासून पायाला भिंगरी लावल्यागत देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरे करीत आहेत. लोकांशी थेट संपर्क करीत आहेत. त्यांच्या भेटत आहेत, त्यांच्यात मिसळत आहेत, त्यांचे प्रश्‍न, समस्या सोडवत आहेत. थकवा या व्यक्तीच्या आसपासही फिरकत नाही. केव्हाही बघा, चेहरा अत्यंत प्रसन्न. असे दौरे करताना बर्‍याचदा त्यांच्या जिवावर बेततील असे प्रसंग आलेत; परंतु, त्याने ते डगमगले नाहीत. महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याचा मुख्यमंत्री इतका सहजपणे भेटू शकतो, गावागावात भेटी देऊ शकतो, यावर लोकांचा विश्‍वासच बसत नाही. लोकाभिमुख मुख्यमंत्र्यांचा एक नवा मापदंड देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला आहे, हे निश्‍चित.
देवेंद्र फडणवीसांनी केवळ दौरेच केले असे नाही. मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवसापासून लोकहिताच्या कामांना त्यांनी जी गती दिली, त्याची मधुर फळे आज राज्यातील जनतेला चाखायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा कार्यकाळ अत्यंत संघर्षाचा तसेच त्यांची पदोपदी परीक्षा बघणारा गेला. कुठल्याही सरकारसाठी दुष्काळ हा कठीण परीक्षा घेणारा काळ असतो. देवेंद्र यांची कठोर परीक्षा घेण्याचेच निसर्गाने ठरविले होते की काय, असे वाटावे, इतकी नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे त्यांच्या वाट्याला आलीत. सलग दोन वर्षे दुष्काळ, आधीच्या सरकारने रिकामी करून ठेवलेली सरकारची तिजोरी, प्रचंड कर्ज अशा बिकट परिस्थितीत लोकांच्या अपेक्षांना पूर्ण उतरून, लोकाभिमुख, लोकोपयोगी, प्रगतिशील आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थिर कारभार करणे खरेच सोपे नव्हते. विरोधी पक्षातील माजी मुख्यमंत्री देखील याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतील, यात शंका नाही. दुष्काळनिवारणासाठी तत्काळ उपायांसोबतच दीर्घकालीन उपाययोजना करताना, देवेंद्र यांची दूरदृष्टी दिसून आली. जलयुक्त शिवार हा त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला प्रकल्प, याचे उत्तम उदाहरण आहे. अनेकांना दुष्काळ ही एक पर्वणी असते. अशा लोकांच्या शक्तिशाली लॉबीच्या दबावाला न जुमानता, फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार, शेततळी ही संकल्पना सिद्धीस नेली. त्याचे सुपरिणाम आज आपण पाहू शकतो. आधीच्या सरकारला हे करता आले नसते का? पण इच्छा हवी ना! जनहिताच्या नावावर सत्ता उपभोगणे आणि जनहितास्तव सत्ता राबविणे, यातील फरक देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिला आहे. शेतकरी, ग्रामीण क्षेत्र तसेच शहरी गरीब यांच्यासाठी तर देवेंद्र फडणवीस यांना विशेष कणव आहे. शेतकर्‍यांनी मागणी करावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती त्वरित पूर्ण करावी, असेच घडले. शेतकर्‍यांची समस्या सोडविण्यासाठी इतक्या आत्मीयतेने आणि त्वरेने, दुसर्‍या कुठल्या मुख्यमंत्र्याने निर्णय घेतले असतील, असे वाटत नाही. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी पक्षांनी चालविली होती. फडणवीस त्याला पुरून उरले. शेतकर्‍यांची कर्जमाफी तर केलीच, पण, खर्‍या शेतकर्‍यांचीच कर्जमाफी होईल, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यासाठी थोडा विलंब लागला तर, विरोधी पक्ष, शेतकरी, शेतकर्‍यांचे नकली नेते या सर्वांची तिखट टीकाही सहन केली. परंतु, ते आपल्या निर्णयावरून हटले नाहीत. या पारदर्शतेमुळे सरकारचे कितीतरी कोटी रुपये वाचले आहेत. आज सरकारजवळ खर्‍या शेतकर्‍यांचा अद्ययावत डाटा तयार झाला आहे. त्याचा उपयोग करून भविष्यात खते, बियाणे व इतरही सवलतीच्या वस्तू खर्‍या लाभार्थीला थेट मिळतील, अशी व्यवस्था करणे सुरू आहे. कथित शेतकरी नसलेले देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांसाठी इतके काही करू शकतात, याचा अर्थ त्यांच्याजवळ प्रचंड इच्छाशक्ती आहे, असाच होतो. सरकारवर भ्रष्टाचाराचा एक डाग नाही. ही देखील फार फार मोठी उपलब्धी आहे. राज्यात रेल्वे प्रकल्प असो की, लढावू विमाने निर्मिती प्रकल्प असो, सिंचनाच्या सोयी करणे असो की राज्य भारनियमनमुक्त करण्याची इच्छा असो, देवेंद्र फडणवीसांनी जितके प्रकल्प राज्यात आणले, तितके आतापर्यंतच्या कुठल्याही मुख्यमं÷त्र्याने आणलेले नाहीत, असा आमचा दावा आहे. असे हे तडफदार, लोकहितास्तव क्षणक्षण झिजणारे देवेंद्र फडणवीस यांनी असेच अनेकानेक विक्रम प्रस्थापित करीत, महाराष्ट्राला विकासाच्या, प्रगतीच्या, समृद्धीच्या, सुखा-समाधानाच्या उच्चतम शिखरावर न्यावे, अशीच या राज्यातील सर्व जनतेची इच्छा आहे.

https://tarunbharat.org/?p=69205
Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (267 of 912 articles)


कुहीकर | परम पूज्यनीय, परम आदरणीय, प्रात:स्मरणीय, ‘मद्य’प्रांतातील बहुतजनांचा आधारू, देशद्रोही, पळपुटे, कर्जबुडवे विजय माल्याजी... आपल्याला त्रिवार प्रणाम. हजारदा कुर्निसात. ...

×