ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » सवर्णांना आरक्षण…

सवर्णांना आरक्षण…

सर्वच धर्मातील सवर्णांना आर्थिक निकषांवर दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्हच म्हटला पाहिजे. पंतप्रधान म्हणाले तसा तो ऐतिहासिक निर्णय तर आहेच, पण काळाची गरज या कसोटीवरही त्याची नितान्त आवश्यकता नोंदविता येईल. या संदर्भातील प्रस्ताव ऐन निवडणुकीच्या तोंडावर चर्चेला आणला गेला, यापलीकडे कुणाला त्यावर फारसा ठोस आक्षेप नोंदवता आलेला नाही. अगदी मायावतींपासून तर काँग्रेसपर्यंत सर्वांनाच ठरावाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे लागले, यातून त्यांची स्वत:ची राजकीय अपरिहार्यता सिद्ध होत असताना, हा प्रस्ताव मांडण्याच्या मुहूर्तामागील राजकारणावर कुणी आक्षेप नोंदवावा, यासारखा दुसरा विनोद नाही. समाजातील जी जी म्हणून व्यक्ती, कुठल्याही कारणांमुळे इतरांच्या तुलनेत मागे राहून गेली असेल, तिला हात देऊन सर्वांच्या बरोबरीने आणणे, ही एकीकडे राज्यकर्त्यांची जबाबदारी, तर दुसरीकडे उर्वरित समाजानेही त्या प्रक्रियेत आपला वाटा उचलला पाहिजे. त्यातून एकसंध, मजबूत, समरस समाजाची निर्मिती सिद्ध व्हावी, एवढेच.
खरंतर कुणालाच आरक्षणाची गरज पडू नये समाज इतका उन्नत व्हावा. पण, भारतीय समाजव्यवस्थेत जाती-धर्माच्या भिंती इतक्या भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत, शिवाय त्याला राजकारणाची जोडही इतकी बळकटपणे मिळत गेली आहे की, या भिंती जमीनदोस्त होण्याऐवजी दिवसागणिक अभेद्य होत चालल्या आहेत. कधीकाळी अशाच काहीशा कारणांमुळे समाजव्यवस्था विसकळीत झाली. ही व्यवस्था एकदा का बिघडली की त्याचा त्रास, मागास जातीत जन्म झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होतो, तसा तो अग्रजातीत जन्माला आलेल्या ज्ञानेश्‍वरमाउलीलाही होतो. म्हणूनच मुळातच भर, ती विसकळीत समाजव्यवस्था दुरुस्त करण्यावर असायला हवा. नादुरुस्त समाजव्यवस्थेतून जी विषमता स्वातंत्र्यपूर्व काळात या देशात निर्माण झाली, त्यातून एक वर्ग प्रवाहाच्या तुलनेत खूप मागे राहिला. जगाच्या पाठीवर असे भेदाभेद, शोषण, अन्याय, न्यायासाठीची लढाई… सर्वदूर अनुभवायला मिळते. हे भेद कुठे रंगांच्या आधारे आहेत, तर कुठे आर्थिक परिस्थितीवर बेतलेले. यातला जो कुठला वर्ग मागासलेला राहिला, त्याच्या सामाजिक प्रगतीसाठीचे सामूहिक प्रयत्न हेदेखील वैश्‍विक पातळीवरील सत्य आहे. भारतात कधीकाळी सवर्णांचा प्रभाव असलेल्या समाजरचनेतून एक समूह मागासलेला राहिला. शिक्षणापासून तर सामाजिक अधिकारांपर्यंतच्या सर्वच बाबतीत मागे राहिलेला तो वर्ग इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी म्हणून आरक्षणाची पद्धत १९५० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेवरून, इतर नेत्यांच्या सहमतीने अंमलात आली. हळूहळू समाजव्यवस्था बदलत गेली. जाती-धर्माचे भेद समाजरचनेतून बाद होत गेले. कालौघात ते मनातून बाद होण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राजकीय पातळीवर मात्र थोड्याशा राजकीय लाभाच्या आमिषापोटी, हे भेद कायम राखण्याचा अट्टहास राहिला. त्या दुराग्रहापायी मनामनांत निर्माण झालेले मळभच सध्याच्या नकारात्मक सामाजिक चित्राला कारणीभूत ठरले आहे.
मागासवर्गीयांसाठी आरक्षण मागताना दस्तुरखुद्द बाबासाहेबांनाही, आरक्षणाची ती व्यवस्था काही कायमस्वरूपी अपेक्षित नव्हती. आरक्षणाच्या कुबड्यांद्वारे कुठलाही समाज स्वबळावर खंबीरपणे उभा राहू शकत नाही, ही वास्तविकता त्यांनाही मान्य होती. पण, स्पर्धेच्या दृष्टीने बरेच मागे राहून गेलेल्या आपल्याच समाजबांधवांना मदतीचा हात देऊन पुढे, बरोबरीने आणण्यासाठीची त्याची निकडही महत्त्वाची होती. त्याचे सकारात्मक परिणामही नंतरच्या काळात दिसू लागलेत. कालच्या मागासवर्गीय समूहातले लोक आज समाजाच्या विविध क्षेत्रात अग्रस्थानी दिसू लागले आहेत. दुर्दैव फक्त एवढेच आहे की, इथवर पोहोचल्यानंतरही आरक्षण नाकारण्याचे धैर्य आणि बुद्धी कुणालाही होत नाही. आपण समोर आल्यानंतर, मागच्याला हात देऊन आपल्या बरोबरीत आणण्याची शृंखला त्यामुळे खंडित होते खरंतर. पण, त्याचे भान हरपले गेले असल्याचेच चित्र आहे सध्या सर्वदूर. म्हणूनच की काय, पण आरक्षणाचा लाभ मिळूनही आदिवासी समाजातील, भटक्या विमुक्त जमातीतील पात्र उमेदवार न मिळण्याची वस्तुस्थिती अनुभवायला मिळते.
सवर्ण समूह, ज्याचा सुरुवातीपासूनच संपूर्ण सामाजावर प्रभाव होता, पगडा होता. जो घटक शिक्षणापासून तर इतर सर्वच बाबतीत अग्रेसर होता, त्याच्यासाठीही आरक्षणाची गरज कालौघात निर्माण झाली. कारण, केवळ जन्म एका प्रगत जातीत झाला म्हणून काही जन्मत:च लोक गर्भश्रीमंत होत नाहीत. त्यासाठी स्वबळावर अभ्यास, मेहनत करण्याची तयारी असावी लागते. शिवाय संधीचीही गरज असते, ती वेगळीच. ती संधीच केंद्र सरकारच्या कालच्या निर्णयातून भविष्यात या समूहाला उपलब्ध होणार आहे. गरिबी आणि अनारोग्य हे काही जात, धर्म पाहून कुणाच्या वाट्याला येत नसते. स्वातंत्र्योत्तर काळात, एकीकडे जात-वर्णव्यवस्था संदर्भहीन होत असताना, सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समूहालाही इतरांच्या बरोबरीने आणण्याची निकड निर्माण झाली. केंद्र सरकारने मांडलेल्या आणि संसदेत मंजूर झालेल्या प्रस्तावातून त्याचेच प्रतिबिंब उमटले आहे. यात सर्वच धर्मातील उच्च जातींचा समावेश करण्यात आला असल्याने, मोठा दिलासा या घटकाला मिळाला आहे.
१२४ व्या घटनादुरुस्तीद्वारे सवर्णांसाठीच्या आरक्षणाचा प्रस्ताव मांडताना, केंद्रीय समाज कल्याण मंत्री थावरचंद गहलोत यांनी विशद केलेली भूमिकाही स्वागतार्ह म्हटली पाहिजे. समाजात जो जो म्हणून दुबळा आहे, त्याला बळकटी देण्याच्या सरकारी पातळीवरील जबाबदारीचे वहन या निर्णयातून होणार आहे. सवर्णांना आरक्षणाचा लाभ देताना सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणव्यवस्थेला कुठेही धक्का लागणार नाही, याची हमी तर त्यांनी दिलीच, पण दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनापूर्तीचा ध्यासही त्यांच्या विधानातून उद्धृत होतो. समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीची कल्पना तरी कुठे जातीभोवती विणली गेली आहे? जातीच्या आधारे असो वा मग आर्थिक परिस्थितीमुळे, सामाजिकदृष्ट्या असो वा मग शैक्षणिकदृष्ट्या… दुबळ्या ठरलेल्यांना पुढे येण्यासाठी म्हणून मदतीचा हात देणे, एवढीच आरक्षणव्यवस्थेतून साकारणे अपेक्षित असलेल्या परिणामांची कल्पना आहे. ती भविष्यात प्रत्यक्षात यावी, हीच इच्छा!
एक श्रीमंत अन् एक गरीब, एक उच्चविद्याविभूषित अन् एक अशिक्षित, शहरी अन् ग्रामीण, एक पहिलवान अन् एक हाडकुळा माणूस, यांच्यात स्पर्धा तरी कशी होऊ शकेल? शेवटी शर्यत तर बरोबरीच्यांमध्येच होऊ शकेल. सर्वांनी स्वबळावर सामर्थ्यवान व्हावे आणि स्पर्धेला तोंड देण्याइतपत स्वत:ला सिद्ध करत यश साध्य करावे, ही आदर्श परिस्थिती झाली. अपेक्षा तर सर्वांना त्या आदर्श परिस्थितीचीच आहे. पण, ती निर्माण होत नाही तोवर, ज्याला ज्याला गरज आहे त्याच्या त्याच्या मदतीला धावून जाणे ही एकीकडे सरकारची, तर दुसरीकडे उर्वरित समाजाचीही जबाबदारी आहे. आरक्षणाचा निर्णय घेऊन सरकारने त्याचे दायित्व पूर्ण केले आहे. आता जबाबदारी सामाजाची आहे. गरज नसणार्‍यांनी आरक्षण आणि सवलती स्पष्टपणे नाकारल्या पाहिजेत. इतरांना पुढे येण्याची संधी त्यातून उपलब्ध करून दिली पाहिजे. हा समंजसपणा प्रत्येकाने दाखवला, तर आरक्षणाविना, शंभर टक्के खुल्या स्पर्धेचे वातावरण निर्माण होईल आपल्याही देशात एक दिवस…

https://tarunbharat.org/?p=72158
Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (136 of 847 articles)


जहागीरदार | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सवर्णवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना १० टक्के आरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेत, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ...

×